Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९
धुळे व जळगांव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे विविध समस्यांचे होणार निरसन
प्रतिनिधी:धुळे/जळगाव:शिवाजी पारधी
दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ अन्वये धुळे व जळगांव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना बस प्रवास भाडे सवलत साठी समाज कल्याण विभागात पास साठी वारंवार चक्करा मारावे लागते अगोदर आपले सरकार वेब पोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करावा लागत होते आता तसे न करता ज्या दिव्यांग (अपंग ) बांधवांच्याकडे केंद्र सरकारचे युनिक कार्ड (वैश्विक कार्ड) म्हणजे स्वालबन कार्ड पोस्टाने किंवा इ-प्रिंट असेल त्यांनी थेट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस टी ) डेपोत जाऊन ६५% ते १०० % दरम्यान अपंगत्व असलेल्या व्यक्तीस सोबतीस ५०% सवलत असलेला सही शिक्का असलेला दाखला घेणे आवश्यक आहे तरच सोबतीस ५०% सवलत दिली जाईल व ६५% टक्के खालील अश्या व्यक्तीने फक्त युनिक कार्ड वाहकास दाखवून प्रवास सवलती चा लाभ घेऊ शकतात तसेच दिव्यांग लोकांना बस स्टँड वर विलचेर, व विना वाहक बाय पास बस चे तिकीट काढण्यास रांगेत उभे राहण्याची गरज नाही त्यांना त्यांचे आरक्षित सीटच दिले जाईल या सर्व विषय चे सविस्तर चर्चा करण्यात आली त्यासाठी आज दि. ४ ऑक्टोबर २०१९ रोजी धुळे आगार प्रमुख भगवान जगणोर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली त्यात दिव्यांग बांधवांना वाहक कडून येणाऱ्या समस्यां मांडण्यात आल्या त्याचे निरसन केले जाईल तसेच सवलत पास दाखला छपाई करून प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य धुळे यांच्या कडून छपाई करून उपलब्ध करण्यात आली आहे त्यावेळी आपल्या स्थरावर प्रवासात युनिक कार्ड ग्राह्य धरावे व वाहकास तश्या सूचना देखील देण्यात याव्या या साठी निवेदन देण्यात आले या प्रसंगी धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत सुर्यवंशी धुळे , धुळे शहराध्यक्ष तसेच खजिनदार महाराष्ट्र राज्य अड कविता पवार धुळे , शहराध्यक्ष योगेश पवार अमळनेर, किशोर पाटील फागणे, जिल्हा महिला अध्यक्ष इंदूताई क्षिरसागर , संजय सोनवणे , अरुण पाटील तसेच प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा