Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

पाडळसरे धरणाबाबत सत्ताधारी व विरोधक यांचे नाकर्तेपण आणि अपयश






पाडळसरे धरणाबाबत सत्ताधारी व विरोधक यांचे  नाकर्तेपण आणि अपयश  


BY ऑनलाईन तरुण गर्जना
October 2, 2019
पंकज पाटील (उपसंपादक)


  • दोन दशकापासून  तालुक्यात  फक्त पाडळसरे धरणाच्या नावाने राजकारण
  • शेतीला पाणी हाताला कामाचा नारा देत जनतेची फसवणूक
  • तालूक्यातील लोकप्रतिनिधीचे  जनतेच्या मुलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष


 अमळनेर तालुक्याचे राजकारण दोन दशकापासून पाडळसरे धरणाच्या अवतीभवतीच फिरत  धरणाचा मुद्दा हातात घेवून  लोक तालुक्यात आमदार झालेत . तालुक्यात विधानसभा व विधानपरिषद   असे दोन आमदार असतांना देखिल धरणाचा विषय मार्गी लागलेला नाही .पाडळसरे धरणाचा अभ्यास अमळनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व विरोधक  यांच्याकडे नसल्याने धरणाचे काम गल्ली ते दिल्ली सत्ता असतांना देखिल त्यामानाने प्रगतीपथाने ,गंभीरतेने होवू शकलेले  नाही .यानिमित्ताने विद्यमान दोनही  आमदार व विरोधकांच्या  मवाळ भूमिकेमुळे त्यांचा नाकर्तेपणा वा अपयश जनतेच्या समोर आले  आहे.


 तालुक्यात २०१४ साली झालेल्या निवडणुकीत आमदार शिरीष दादा याना जनतेने निवडून दिले . अनिल दादा यांना दुसऱ्या क्रमांकावर तर साहेबराव पाटील यांना त्यांच्या उर्मट स्वभावामुळे शेवटचे स्थान मिळाले .संपुर्ण पाच वर्षात आमदार शिरीष दादा यांचे विरोधक म्हणून अनिल दादा कुठेच प्रखर विरोध करतांना दिसून आले नाहीत.स्वतःची पुढील वाट सुखकर करण्यासाठी त्यांनी अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेत आमदार साहेबराव पाटील यांना तालुक्यात पाय ठेवायला जागा करून दिली .


 राष्ट्रवादीचे खंदे समर्थक माजी आमदार साहेबराव पाटील स्वतःच्या व्यक्तीक फायद्यासाठी अनिल दादा यांना विश्वासात न घेता भारतीय जनता पार्टीत आपल्या सौभाग्यवती यांचे  नगराध्यक्ष पद वाचवण्यासाठी गेलेत.जनतेच्या विश्वासाचा गळा दाबत सत्तेचे गणित मांडत स्वतःच्या फायद्यासाठी जनतेची दिशाभूल करण्यात आली.


 आमदार साहेबराव पाटील यांनी पाडळसरे धरण समितीच्या रथावर स्वार होत आमदार शिरीष दादा याना धारेवर धरले खरे....! पण त्यांचा तो खेळ फसला .समितीचेच काही लोक विद्यमान आमदार यांच्या सोबत लोकसभेच्या रिंगणात प्रचार करतांना दिसलेत.तालुक्याचे राजकारण पाच वर्षात विध्यमान आमदार व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याच अवतीभवती फिरत असतांना दिसले.


 तालुक्याच्या राजकारणात खऱ्या अर्थाने माजी आमदार हेच विद्यमान आमदार यांचे विरोधक ठरले . नगरपालिकेच्या अपात्रतेच्या भानगडीतून माजी आमदार व  विद्यमान आमदारामध्ये  सभांमध्ये ,सार्वजनिक व्यासपीठावर कलगीतुरे उडत राहिलेत.या पाच वर्षात साहेबराव पाटील यांनी तालुक्याचे वातावरण तापत ठेवल.


 अमळनेर नगरपालिकेत नगराध्यक्ष पद वाचविण्यासाठी माजी आमदार भारतीय जनता पार्टीला शरण गेलेत व स्वतःची राजकीय वाद-संवादाची बोलती बंद करून घेतली.त्याचा प्रत्यय अमळनेर  मध्ये  रोटरी क्लब हॉल येथे झालेल्या झी २४ तासच्यादे दना दन” कार्यक्रमातुन  दिसून आला. त्या कार्यक्रमाला माजी आमदार यांना  आमंत्रित केलेले होते ते कार्यक्रमाला येत असतांना अनपेक्षित दबाव जिल्ह्यातून नामदार भाउंचा आल्याने  त्यांनी अर्ध्या रस्त्यातूनच झी २४  तासचे  प्रतिनिधी विकास भदाणे यांना हूल देत पळ काढला .

झी २४ तासच्यादे दना दन” कार्यक्रमाला  ते उपस्थित राहिले असते तर निश्चितच त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रणशिंग फुकले असते . पाडळसरे धरणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदार यांना धारेवर धरत त्यांनी सरकारचा नाकर्तेपणा व अपयश पुढे आणले असते.तसे झाले असते तर अमळनेर नगरपालिकेला अजगररुपी विळखा मारून बसलेले गिरीश भाऊ यांनी त्याचे नगराध्यक्ष पद शंभर टक्के  गिळले असते एवढे मात्र खरे..! सर्व तळजोडी या फक्त सत्तेसाठीच असतात हे  पुन्हा एकदा त्यानिमिताने पुढे आले.


 अमळनेर तालुक्यात या पाच वर्षात फक्त सत्ता हस्तगत करण्याचे राजकारण झाले . जनतेची दिशाभूल व फसवणूक करण्यात कोणत्याच लोकप्रतिनिधीनी  कसर शिल्लक ठेवलेली नाही.पाडळसरे धरणाचा मुद्दा पुढे करून निवडून आलेले विद्यमान आमदार शिरीष दादा यांनी अभ्यासपूर्ण नियोजन करून धरणाचा विषय मार्गी लावणे गरजेचे होते .जनतेला दिलेले आश्वासन त्यांनी पाळले नाही. निवडून आल्यानंतर धरणाला पांढरा हत्ती” म्हणत धरणाच्या कामापासून  दूर पळत राहिले .








अनिल दादा यांनी आपली ठेकेदारी सांभाळत या पाच वर्षात जनतेच्या प्रश्नांना प्रखरतेने हात घातलेला नाही .त्यांनी पाडळसरे धरणावरून तालुक्यात कुठलेही तीव्र आंदोलन जनतेला सोबत घेवून केलेले नाहीत . जनतेला धरण कसे पूर्ण होईल याचे  नियोजन पूर्ण, अभ्यासपूर्ण आश्वासन आजही दिलेले नाही.धरणासाठी   आंदोलन ,मोर्चे यापासून चार हात दूर रहात त्यानी आपल्या ठेकेदारीत आर्थिक ताळेबंद साधण्याचाच  प्रयत्न केला.


 धरणाची  संपुर्ण माहिती   व तांत्रिक बाबींचा अभ्यास असलेला व्यक्ती   साहेबराव दादा यांच्याकडे आहे.त्याचाच बळावर त्यांनी पाच वर्षात धरणाचे काम जलद रित्या केले.पडद्यामागचा बोलविता धनी कोण ? हे अजूनही अमळनेरच्या जनतेला कृषिभूषण यांनी समजू दिलेले नाही व कधी समजणार ही नाही. त्यांना स्वतःला  अजगराचा विळखा व नगरपालिकेचा मोह असल्याने ते त्यांतून बाहेर पडायला तयार नाहीत . अमळनेर तालुक्यातील सर्वांगीण विकासाचे व पाडळसरे धरणाच्या कामाला गती देणारे माजी  आमदार म्हणून जरी त्यांची ओळख  असली तरी त्यांच्या “उर्मट” स्वभावामुळे जनतेने मागच्या विधानसभा  निवडणुकीत विकासाची कामे करून देखिल त्यांना तिसऱ्या क्रमांकावर आणून ठेवले . हे देखिल माजी आमदार विसरलेले नाहीत. त्यामुळे ते नगराध्यक्ष पदावरच समाधानी आहेत


 विध्यमान आमदार दमदार असतांना देखिल पाच वर्षात स्तिथप्रज्ञ दिसलेत .जनतेला हात जोडून प्रश्न सुटत नसतात त्यासाठी अमळनेर तालुक्याचा पाडळसरे धरणाचा प्रश्न मार्गी लावून धरणाचे काम युद्ध पातळीवर करणेच आवश्यक होते .मात्र  या पाच वर्षात  ना वचननामा पूर्ण झाला ,ना विकासाची गंगा आली ! तर दुसऱ्या बाजुला  धरणाचा व तालुक्यातील शेतकऱ्यांचा समस्या सुटलेल्या  नसल्याने सत्ताधारी व विरोधक यांचा नाकर्तेपण आणि अपयश  अमळनेरच्या जनतेसमोर आले आहे.आजही अमळनेरकराना पाडळसरे धरणाचा अभ्यास व ग्रामीण भागातील समस्यांची जाण असलेल्या  भुमीपुत्राची” प्रतीक्षा आहे .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध