Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९
राजीव गांधी फेलोशिप’ बंद करण्याचा केंद्राचा घाट
(1) प्रतिनिधी:योगेश भोई जळगाव
अनुसूचित जाती, जमातीतील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाची दारे बंद?
केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती, जमातीच्या सर्वसामान्य पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सुरू करण्यात आलेली ‘राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप’ बंद करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने २००५ मध्ये अनुसूचित जाती, जमातीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळावी, या उद्देशाने ही फेलोशिप सुरू केली होती. मात्र, केंद्र सरकारने २०१६ पासून या फेलोशिपला कात्री लावली. सप्टेंबर २०१९ मध्ये सर्वसामान्य पदव्युत्तर विद्यार्थ्यांना फेलोशिप व संशोधनाची दारे बंद केली आहेत.
या फेलोशिपच्या माध्यमातून विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, मानवता आणि सामाजिक विज्ञान विषयातील प्रगत अभ्यास आणि संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र, २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर येताच या योजनेतील मूळ उद्दिष्टांना हरताळ फासण्यात आला. २०१५ मध्ये या योजनेतून राजीव गांधी यांचे नाव हटवण्यात आले. त्यानंतर २०१६ मध्ये या योजनेतील विविध नियमांमध्ये बदल करीत अनुदानातही कपात करण्यात आली. ‘सबका साथ, सबका विकास’ असा नारा देत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने २०१८ मध्ये या योजनेच्या गाभ्यालाच धक्का लावत संशोधनासाठी इच्छुक पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संधीच हिरावून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. २०१८ नंतर केवळ नेट, सेट, जेआरएफ उत्तीर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती, जमातीमधील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल, असे संकुचित स्वरूप या योजनेला देण्यात आले. विशेष म्हणजे, नेट, सेट, जेआरएफ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून फेलोशिप दिली जाते. त्यामुळे ही योजनाच हळूहळू बंद करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप आता होत आहे. अनुसूचित जाती, जमातींमधील शेकडो पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसला असून मोदी सरकारने आमच्या हक्कांवर घाला घातल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.
नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेने तसे पत्र केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाला लिहून ही योजना पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.
अनुदान वाटपातही असमानता : संशोधनामध्ये माहिती संकलनाला फार महत्त्व आहे. त्यामुळे या योजनेच्या सुरुवातीच्या काळात संशोधकाला माहिती संकलनाच्या कार्यापासून फेलोशिप दिली जात होती. मात्र, आता यात बदल करून मुख्य संशोधनाचे काम सुरू झाल्यावरच फेलोशिपचा लाभ घेता येणार आहे. यासह नोंदणी झाल्यापासून फेलोशिप न देता नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावरच फेलोशिप सुरू करण्यात येणार असल्याने हा बदलही अनेकांवर अन्यायकारक असल्याचा आरोप होत आहे.
---------------------------------------------
(2) प्रतिनिधी : योगेश भोई जळगाव अमळनेर चे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांना भारतीय जनता पार्टी ची उमेदवारी जाहिर
अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर मतदार संघाचे विद्यमान आमदार शिरिष चौधरी यांना भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी जाहीर केले आहे. अमळनेर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळविण्यासाठी तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. परंतु विद्यमान आमदार शिरिष चौधरी यांनी केलेली कामे,त्यांची लोकप्रियता,कामांची पद्धत,जनतेमध्ये मिसळून कार्य करण्याची जिद्द, कार्यकर्त्याना जोडून ठेवण्याची क्षमता इ च्या जोरावर हे तिकीट विद्यमान आमदार शिरिष चौधरी यांना मिळाले आहे.भारतीय जनता पार्टीचे तिकीट शिरिष चौधरी यांना मिळाल्यामुळे आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवारामध्ये उत्साहाचेे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागले आहे.त्यांच्यात उत्साह संचारला असून बळ वाढले आहे. असे शिरीषदादा चौधरी व मित्र परिवारा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
-----------------------------------------------
(3) धुळे जिल्ह्यातुन 39जणांनी घेतले 79उमेदवारी आर्ज.....
----------------------------------------------
जळगाव प्रतिनिधी-योगेश भोई
धुळे जिल्हयातुन पाचही विधानसभा मतदारसंघातुन मंगळवारी तिसऱ्या दिवशी 39उमेदवारांनी 79आर्ज घेण्यात आले आहे आता पर्येंत 176ईछ्क उमेदवारांनी 339आर्ज खरेदी केले आहे
साक्री मतदारसंघातुन भाजपा कडून दोन आर्ज दाखल करण्यात आले आसुन मात्र या आर्जा सोबत एबी फॉर्म नाही आन्य चारही मतदार संघातुन मात्र एकही उमेदवारांनी आर्ज दाखल केले नाही धुळे शहर .धुळे ग्रामिण.शिद्खेडा.व शिरपुर या चारही मतदार संघातुन मंगळवारी एकही आर्ज दाखल झाला नसुन साक्री मतदार संघातून भाजपाचे ईछूक उमेदवार माजी महापौर मंजुळा गावित.डॉ.तुळशीराम गावित यानी आर्ज भरला आहे.मात्र दोन्हीही उमेदवारी आर्जासोबत एबी फॉर्म नाही.......
-----------------------------------------------
(4) जळगाव शहरात उद्यापासुन दोन दिवसाआड पाणीपुरवठा......
-----------------------------------------------
जळगाव प्रतिनिधी-योगेश भोई
जळगाव शहरांत गेल्या काही वर्षापासुन जळगाव शहर महानगरपालिका ने एक किवा दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे यदा 2016नंतर पहिल्यादा वाघूर धरण 100%भरले आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने 19सप्टेंबर रोजी हा निर्णय जाहिर केला आहे....
ग्रुहीणीना करावे लागणार नियोजन...
पाणीपुरवठाचे नियोजन चुकले म्हणजे कुटुंबात सगळ्यात मोठी चिंता व्यक्त होत होती पाणीपुरवठाच्या दिवशी सर्वे कामे बाजूला ठेऊन पहिले पाणी पुरवठाला महत्वा दिले जात होते.आता नवीन रोटेशन नुसार 2दिवसाआड नियमित पाणी पुरवठा होणार आहे..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा