Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९
शिरपुर तालुक्याच्या जनतेचा व डॉ.ठाकुर यांचा भाजप ला सवाल आमचे काय चुकले ?
शिरपुर - शिरपुर तालुक्यात विधान सभा निवडणुकी पुर्वीच वादळापुर्वीची शांतता आज रोजी समा प्त झाली असुन राजकीय घडामोडीना वेग आला आहे. काल काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा व तालुका अध्यक्ष यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील जनतेचा मो ठ्या प्रमाणावर भावानांचा उद्रेक झाला व सर्वच स्तरातुन तीव्र अशा प्रखर प्रतिक्रिया समो र यायला सुरुवात झाली. ज्या काँग्रेस मागील ३५ वर्षापासुन अ‘रीशभाइंच्या नेतृत्वात हुकूम शाहीचा कहर माजवला होता. अनेक सहकारी संस्था अधोगती आनल्या, शेतकरांचा यांचा कारखाना बुडवला, युवकांचा रोजगार हिरावला, शेतकरी व व्यापारांना देशोधडीला लावले व विकासाच्या नावाने आपल्या स्वताचा विकास करुन घेतला अशी भ्रष्ट्र राजवटीला शिरपुर ची जनता त्रस्त झाली होती. लोकांचा काँग्रेसला विरोध नव्हता मात्र तालुक्यातील हुकूम शाही राजवटीला विरोध होता.ज्यांनी आजवर दबाव तंत्राचा वापर करत नेहमीच आपल्या कानाखालच्या लोकांना सत्तेत ठेऊन त्यांच्या कडून गुलामा सारखे काम करुन घेतले या नितीम त्तेचा विरोध होता म्हणुन जनतेने मा .नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेऊन हा काँग्रेस चा बालेकील्ला असतांना देखिल २०१४ म ध्ये व २०१९ म ध्ये भाजपाला बहुम त दिले कारण आम्हांस परिवर्तन हवे होते. मा त्र आज आम चा विश्वास घात होत आहे अशी भावना तालुक्यातील जनतेने व्यक्त केली. ज्या डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी मा गील १० वर्षांपासुन शिरपुर तालुक्याच्या जनतेची अविरत सेवा केली. पक्ष मजुबत केला, रक्ताचे पाणी केले, आपला व्यवसाय सोडला लोकांची आरोग्य सेवा केली, अनेकांना जिवनदान दिले, करोंडाचा निधी आणुन विकासात भर घातली, भाजपाला वाढवले, रुजवले मोठे केले आणी आज याच भाजपाच्या वरीष्ठांना आयारामा ना साथ देत शिरपुर तालुक्याच्या जनतेची व जन सामा न्यांचा नेता म्हुणन आज ज्यांची घरा घरात स्थान आहे त्या डॉ.ठाकुर यांचा विश्वास घात केला असुन हा विश्वासघात डॉ.ठाकुर यांचा नव्हे तर शिरपुर तालुक्याच्या जनतेचा आहे आणी जर डॉ.ठाकुर यांना उमेदवारी दिली नाही तर जनता हे कदापी सहन करणार नाही आणी याचे परिणाम पक्षास भोगावे लागतील. त्यामु ळे आज ही संधी आहे की जन भावनांचा आदर करा अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहा असा सज्जळ ईशारा शिरपुर तालुक्याच्या जनतेने भाजपा पक्ष श्रेष्ठींना दिला असुन मा झे काय चुकले ? असा सवाल डॉ.ठाकुर यांनी उपस्थित केला आहे.
काल डॉ.ठाकुर यांच्या स‘रणारनार्थ एक विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या तालुक्यातील जनता एक व्हाटअप मॅ सेज वर हजारोंच्या संख्यने उपस्थित होऊन जनभावनांचा उ्रद्रेक काय असतो याची प्रचिती पहावयास मि ळाली. या वेळी उपस्थितांना तिव्र शब्दात आपली प्रतिक्रया मा डल्या. या वेळी आ.अम रीश पटेल व आ.काशिराम पावरा यांच्यावर जहरी टिाक करण्यात आली. म रेल पण पक्ष सोडणार नाही असे म्हणणारे आज का पक्ष बदल करत आहेत कारण त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. ईडी च्या चौकशी सुरु आहेत, अनेक प्रक़ारचे कर्ज देणे आहे, गंभिर प्रक़रणे हाय कोर्टात पोहचली आहे आणी आपली कधीही जेलवारी होऊ शकते म्हणुन हे स्वार्र्थी लोक जनतेच्या विकासाच्या नावाने स्वतांचा बचाव करणे साठी पक्ष बदल करत आहेत अशी भावना बोलुन दाखवण्यात आली. या मो ठ्या संख्यने तालुक्यातील तळागाळातील पदाधिकारी, सरपंच,विविध संस्थांचे सदस्य, सामा जिक कार्यकर्ते,उपस्थित होते.
सदर कार्यक़्रमा त रंधे परिवाराची भुमीका मो लाची होती. मा त्र संपुर्ण रंधे परिवार एक दिल एक एक म ताने समो र येऊन त्यांनी डॉ.ठाकुर यांचा सम र्थन दिल्याने जनेतेच्या उत्साह जोमा त होता. त्यामुळे सर्वच भाजपाच्या कार्यकत्यांनी आपली भुमी का स्पष्ट केली की आम्ही भाजपाशी एकनिष्ठ होतो आहेत आणी राहणार, मा त्र पक्षाचा हा निर्णय आम्हांस मा न्य नाही. पक्षाने कोणास प्रवेश द्यावा हा त्यांचा विषय आहे. यास विरोध नाही. मा त्र याने सामा न्य कार्यकर्ता ,जनता व विश्वासाने लोक सेवा करणाऱ्या या कार्यकत्याचा विश्वास घात होऊ नये याची काळजी पक्षाने घ्यावी. अन्यथा जर आम च्यावर अन्याय झाला आणी आम च्या म ना विरुध्द उमेदवार आम च्यावर लादला गेला तर मा त्र आम्ही २४ तारखेपर्येत पक्षाचा हा निर्णय मा न्य करणार नाही. आणी अन्याय देखिल सहन करणार नाही त्या वेळी आम्ही आम ची स्वतंत्र्य भुमी का घेऊ. आणी २४ तारखेनंतर पुन्हा आम्ही पक्षासाठी स्वताला वाहून घेऊ अशी धम की वजा इशारा भाजपाच्या वरीष्ठांना देण्यात आला आहे. त्यामु ळे आता रडायच नाही तर लढायच असा निर्धार करण्यात आला आहे. तालुक्याच्या जनतेला भाजपा विरोध नाही मा त्र काँग्रेस म धुन आयात केलेल्या व्यवक्तींचा व त्यांच्या कार्यपध्दतीचा विरोध आहे. आणी तो कायम राहील.
जन सैलाब व जनभावना काय असतो याची प्रचिती देखिल आज तालुक्याने पाहीली. डॉ.ठाकुर यांची लढाई ही जनतेची लढाई आहे आणी म्हणुन त्यांना न्याय देण्यासाठी व विधान सभेवर पाठवण्यासाठी जनतेने स्वंस्पुर्तीने लोखों रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली व दिली देखिल. त्यामु ळे आगामी काळात डॉ.ठाकुर यांना जनता स्वता: तन म न धन देऊन म दत करेल यात शंका नाही. म्हणुन जनतेने आज आपली ताकद दाखवत अजुन ही वेळ गेलेली नाही. जन भावानांचा विचार करुन आम्हांस न्याय द्या अथवा परिणाम भोगण्यास तयार रहा असा ईशारा दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा