पंकज पाटील (उपसंपादक)
BY ऑनलाईन तरुण गर्जना
४ ऑक्टोबर २०१९
अमळनेर
तालुक्यातील जनतेला पाडळसरे धरणाचे वचन देवून सत्ता हातात घेतली त्या धरणाचे एक
इंच देखिल काम पाच वर्षात झाले नाही .
ना शेतीला पाणी मिळाले ना हाताला काम.
शिक्षण ,आरोग्य,शेतीला पाणी ,सिंचनाची
आधुनिक सुविधा ,तीर्थक्षेत्र विकास ,कृषी योजना या आमदारांच्या वचननाम्यातील
सुविधा फक्त कागदावरच राहिल्यात .
शेतीला पाणी , हाताला कामाचा नारा देत विद्यमान आमदार यांनी अमळनेर तालुक्याची आमदारकी सांभाळली . मुगेरीलाल के हसीन सपने दाखवत पाडळसरे धरणाचे काम पूर्ण करु असे आश्वासन ग्रामीण जनतेला दिले . पाच वर्षाच्या कार्यकाळात अमळनेर तालुक्याची जनता हे स्वप्न पूर्ण होईल याची आशा करत स्वप्न पहात राहिली . गल्ली ते दिल्ली पाच वर्ष सत्ता व सत्ताधारी पक्षाचे समर्थक आमदार असतांना देखिल अमळनेर तालुक्यातील धरणाचे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही . पाडळसरे धरणाला ज्यांनी पांढरा हत्ती म्हटले त्या विद्यमान आमदार यांच्याकडून ग्रामीण जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता पाच वर्षात झाली नाही. ग्रामीण भागात जन्मून मातृभूमी साठी कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांच्या कामाचे श्रेय आमदार साहेब घेत असून विकास पर्वच्या नावाने तालुक्यात २०१४ च्या वचननाम्यातील प्रश्न बाजुला सारून जनतेची दिशाभूल करत आहेत.
विद्यमान आमदार यांचे विकास पर्वाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल –
विद्यमान आमदार यांनी तालुक्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी चालू केलेले विकास पर्वाचे थोतांड प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तालुक्यातील एक गांव दत्तक घेवून त्यांनी भारतातील सर्वात सुंदर व स्वच्छ ग्राम मावल्यान्नाग गावासारखे एक तरी गांव अमळनेर तालुक्यात तयार करून दाखवणे गरजेचे होते . अमळनेर तालुक्यात असे एक जरी गांव तयार झाले असते तर खऱ्या अर्थाने विकास पर्वाचे मानकरी आमदार ठरले असते . ग्रामीण भागात काम करत असतांना ग्रामीण भूमिपुत्रांच्या कामाचे श्रेय घेवून विकास पर्वाची जाहिराती द्वारे थोतांड म्हणजे अमळनेरच्या जनतेची निवड दिशाभूल आहे.
खुप झाले रस्ते,पुल , मोऱ्या व समाज मंदिर...!
पाडळसरे धरणाचे काय ?
शेतीला पाणी व
हाताला कामाचे काय ?
जनतेच्या समस्या तुम्ही जाणून घेतल्याच नाहीत .
शेजारच्या तालुक्यात पिक विम्याचे लाखो रुपये मिळालेत .
अमळनेरच्या जनतेचे
पिक विम्याचे व कांद्या अनुदानाचे पैसे गेलेत कुठे ?
विध्यमान आमदार यांनी तालुक्यात व गावा –गावांत विकासाची कामे केलीत पण जि कामे घेवून ते सत्तेत आले त्यातली कोणतीच कामे करू शकले नाहीत .ना हाताला काम मिळाले ना पाडळसरे धरणाचे काम एक इंच वाढले . मुळात म्हणजे काम सुरु होण्यासाठी धरणाचे संकल्प चित्र सुद्धा तयार नव्हते ही बाब देखिल अभ्यास करण्यासारखी आहे.
तालुक्यात आमदार साहेबांनी जो वचननामा सादर केला होता त्यातील शिक्षण ,आरोग्य,शेतीला पाणी ,सिंचनाची आधुनिक सुविधा ,तीर्थक्षेत्र विकास ,कृषी योजना यातल काहीच अमळनेरच्या जनतेच्या पदरी पडलेले नाही.गावा- गावांत तिथल्या भूमिपुत्रांनी पुढाकार घेवून कामे केली. त्याठिकाणी तरी त्यांनी हे विकास पर्वाचे थोतांड थांबवावे .
मारवड ,निम व दहिवद येथील विकास पर्वाचे जनक तिथले भूमिपुत्रच –
आज जनतेसमोर जातांना आमदार साहेब विकास पर्वच्या जाहिराती द्वारे अमळनेरच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. वास्तव चित्र मात्र वेगळे आहे .विकास पर्वात दाखवलेला जनसागर हा तापी नदीतील कपिलेश्वर याठीकाणाचा आहे.अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील झालेला विकास हा त्या मातृभूमीत जन्माला आलेल्या भुमीपुत्रामुळेच झाला .
मारवड येथील विकासाचे शिल्पकार त्या गावांतील मारवड विकास मंचच्या माध्यमातून काम करणारे मावळे व त्यांचे मार्गदर्शक अप्पर आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांच्याच कार्याचा ठसा आहे. त्यात जलसंधारणाची कामे असोत किंवा गांव पर्यावरण पूरक करण्यासाठी केलेले प्रयत्न हे त्या गावांतील युवकांचेच .माळण नदी पुनर्जीवन करण्यासाठी मिळवलेला निधी हा देखिल मारवड विकास मंचातील सदस्यांनी मा.मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या समोर तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल व मारवड विकास मंच सदस्य यांनी केलेल्या पावर पॉईट प्रेझेंटेशनचेच फलित आहे. त्यात देखिल तालुक्याच्या पुढाऱ्यांनी श्रेय घेतला तो भाग त्यांच्या मानसिकतेचा आहे.
जलयुक्त शिवारात गावाची निवड कशी होते याविषयी जाणून घेवू या –
जलयुक्त शिवार ही योजना मुख्यमंत्री यांची महत्वाकांशी योजना आहे . त्यासाठी आपण जलयुक्त शिवारात गांवाचे नांव येण्यासाठी त्या गावांत पाण्याची टंचाई याची तीव्रता पाहून निर्णय घेतला जातो. गांवी पाणी टंचाई तीव्र असल्याची नोंद अमळनेर पंचायत समिती , तहसील कार्यालय व कृषी विभाग यांच्या लक्षात आणून दिली जाते. त्यानुसार त्यागावाची प्राधान्य क्रमाने निवड केली जाते. ही संपुर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक शासकीय प्रणाली राबविली जाते व नियोजन बद्द कार्यक्रम आखला जातो .त्यात प्रशासनाला पाठ पुरावा करणे अधिकारी यांच्याशी संपर्क करत गांव जलयुक्त शिवारात समाविष्ट व्हावे यासाठी दहिवद गावांतील झी २४ तास न्युज वृत्त वाहिनी मध्ये कार्यरत असलेले दहिवद गावचे भुमिपत्र विनोद पाटील (झी २४ तास - Dy.Executive producer) व जयवंत पाटील यांनी तत्कालीन प्रांत अजय मोरे यांच्याकडे पाठपुरावा करत गांव जलयुक्त शिवारात समाविष्ट केले .जलयुक्त शिवार योजना गावांत शेतकऱ्यापर्यत पोहचावी म्हणून या भुमी पुत्रांनी मेहनत घेतली .दहिवद गावांतील मागील जलयुक्त शिवाराअंतर्गत झालेले दोन बंधारे पुरवणी आराखड्यात गावांत ग्रामसभेतून मंजूर करत पंकज पाटील ,प्रशांत भदाणे ,गब्बर पाटील , बबलू पाटील व शिवाजी पारधी यानी तत्कालीन जिल्हाधिकारी निंबाळकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत मार्गी लावलेत . तालुक्यातील आमदार जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष असतात व त्यांच्या देखरेखीत जलयुक्त शिवाराची कामे होत असतात परंतु अमळनेर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील एकही काम शासनाच्या अंदाजपत्रकानुसार झालेले नाही त्यात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला आहे. वेळोवेळी तश्या तक्रारी तालुक्यातील ग्रामस्थांनी केल्या आहेत .
दहिवद गावांत हिरा उद्योग समुहाचे काडी मात्र देखिल योगदान नसताना कार्यकर्ते श्रेय घेतांना
दहिवद गावांत हिरा उद्योग समुहाच्या माध्यमातून नालाखोलिकरणाचे एक इंच देखिल काम झालेले नाही. दादा समर्थक कार्यकर्ते हिरा उद्योग समुहाने दहिवद गावांत सुंदर काम केला असल्याचा प्रचार व जाहिरात करत आहेत .
हिरा उद्योग समूह व जलयुक्त शिवार योजनेचा काय संबध ?
मुख्यमंत्री यांची महत्वकांशी जलयुक्त शिवार योजना हिरा उद्योग समूह चालवते की काय ?
हिरा उद्योग समूह हा जलयुक्त शिवार योजनेपेक्षा मोठा असल्याचा कार्यकर्ते सोशल मिडिया वर प्रचार करत आहेत .जलयुक्त शिवार योजनेत खर्च होणारा पैसा हा जनतेचाच असून तो जनतेसाठीच खर्च केला जातो . त्याठिकाणी मी फार मोठे काम केले असा भाव आणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

दहिवद गांव पर्यावरण पूरक करण्यासाठी केलेले प्रयत्न –
वृक्ष मित्र पंकज पाटील ,धर्मवीर भदाणे तत्कालीन ग्रामसेवक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाने दहिवद विकास मंचाच्या माध्यमातून गावांतील भारतीय सेनेत असलेल्या तरुणांनी व गावातील कामानिमित्त गेलेल्या भूमिपुत्रांनी दिलेल्या निधीतून हजारो झाडे लावण्यात आली . प्रशासनाने बिहार पद्धतीने वृक्षाचे संगोपन करत गांव पर्यावरण पूरक करण्यासाठी मदत केली. गांव पर्यावरण पूरक करण्यासाठी दहिवद गावचे सुपुत्र निलेश भदाणे (जिल्हानियोजन अधिकारी ,नगर ) यांनी व गावकऱ्यांनी प्रयत्न केलेत .

पाणी फोऊडेशनच्या माध्यमातून गावातळे व नाला खोलीकरण –
पाणी फाऊडेशनच्या स्पर्धेत तालुक्यातील दहिवद हे एकमेव असे गांव होते ज्या गावांत पाणी फाऊडेशनचे काम सुरु असतांना एकाही राजकीय नेत्याने भेट दिली नाही .खुद आमदार सुद्धा कामाच्या ठिकाणी श्रमदान किंवा आर्थिक मदत देण्यासाठी पुढे सरसावले नाहीत. या कामासाठी देखिल दहिवद गावांतील तरुण व भूमिपुत्र एकवटत त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी जमा केला .गावातील सटाणा येथे कार्यरत असलेले पीआय वासुदेव देसले, किरण माळी ,प्रभाकर माळी यांनी मोठे दान देत पाणी फोऊडेशनच्या कामात प्राण फुकले .मारवड विकास मंचाचे जेसीबी दहिवद विकासमंचाला तब्बल दोन महिने पाणी फाऊडेशनच्या कामासाठी देण्यात आले.खुद्द प्रशासनाच्या जलयुक्त शिवाराच्या कामाला मागे टाकत महाराष्ट्रातील शिरपूर पँटर्न प्रत्यक्षात तालुक्यात फक्त दहिवद गावांत पाणी फाऊडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आला. गावकऱ्यांच्या एकजुटीच्या जोरावरच तालुक्यात पाणी फौन्डेशनच्या कामांत दुसरे बक्षीस दहिवद गावाने मिळवले .पाणी फोऊडेशनच्या कामात तब्बल अकरा कोटी लिटर पाण्याचा साठा तयार करण्यात आला.हे संपुर्ण श्रेय तिथल्या भुमिपुत्रांनाच जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा