Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९
रोहन देशमुखांची तुळजापूर विधानसभेसाठीची भूमिका आज होणार स्पष्ट
प्रतिनिधी विशाल डुकरे: उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी रोहन देशमुख यांनी मागील पाच वर्षांपासून तयारी केली होती. यासाठी त्यांनी दांडगा जनसंपर्क ठेऊन, विविध विकास कामांसाठी पाठपुरावा करून लाखोंचा निधी देखील विधानसभा क्षेत्रासाठी आणला.
भाजप शिवसेना युती घोषणा झाली, उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि तुळजापूर विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांना देण्यात आली आहे. यामुळे रोहन देशमुख काय निर्णय घेणार ? त्यांचा पाठिंबा राणाजगजीतसिंह पाटील यांना असणार का ? यासर्व विषयावर आता चर्चा होत आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ४ ऑक्टोबर रोजी, सकाळी १० वाजता, तुळजाभवानी पुजारी मंडळ कार्यालय, तुळजापूर येथे मेळाव्यातून रोहन देशमुख आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत, त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा