Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

चोपडा महाविद्यालयात युवतीसभे अंतर्गत आयोजित “आठ दिवसीय स्वयंसिद्धा अभियानाचा” समारोप






चोपडा प्रतिनिधी विनोद निकम:महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंसिद्धा अभियानाचे आयोजन दिनांक २४/९/२०१९ ते १/१०/२०१९  दरम्यान करण्यात आले होते. यात ज्युडो कराटे व मार्शल आर्ट याचे प्रशिक्षण श्री. आत्माराम बाविस्कर यांनी दिले व ६० विद्यार्थिनी यात सहभाग घेतला. आज दिनांक १/१०/२०१९ ला “आठ दिवसीय स्वयंसिद्धा अभियानाचा”  समारोप झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पितृतुल्य दादासाहेब डॉ. सुरेशजी पाटील (म.गां. शि. मंडळ, संस्थापक अध्यक्ष)  हे होते. तसेच या कार्यक्रमा प्रसंगी मा. आशाताई विजय पाटील (म.गां. शि. मंडळ, उपाध्यक्षा),    मा. ताईसाहेब डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील, (म.गां. शि. मंडळ, सचिव), मा.  डॉ. डी. ए. सूर्यवंशी (प्राचार्य,ए. एस. सी, कॉलेज चोपडा) उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. ए. एल चौधरी, मा. प्रा.डॉ. के. एन सोनावणे व मा. प्रा. श्री एन. एस. कोल्हे, प्रा. श्री व्ही. पी. हौसे (विद्यार्थि विकास  अधिकारी),प्रा. सौ. एम. टी. शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु. अश्विनी सैदाणे व कु. अश्विनी साळुंखे या विद्यार्थीनिनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर आठ दिवसात घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक मुलींनी श्री. आत्माराम बाविस्कर व राहुल निकुंब  यांच्या मदतीने एका पथनाट्या द्वारे सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींन समोर करून दाखवले. ज्यात बस मध्ये प्रवास करताना गर्दीच कारण दाखवून छेड काढणाऱ्या मुलांना कसा धडा शिकवावा, एखाद्या व्यक्तीला दुर्बल समजून त्याकडून ऐवज लांबवनाऱ्या चोराला कसे मारावे तसेच शिकत असताना गुंड प्रवृत्तीच्या मुलांना घाबरून न जाता त्यांची मुलीना त्रास देण्याची खोड कशी मोडावी हे ह्या प्रात्यक्षिकातून अतिशय प्रभावीपणे दाखवून दिले. उपस्थित मान्यवरांनी त्या मुलींचे कौतुक केले व त्यांना प्रोस्ताहन दिले. त्यानंतर कु. वृषाली पाटील हिने आठ दिवसात आपल्याला मिळालेले प्रशिक्षण अतिशय प्रभावी होते व आता त्या स्वतः चे रक्षण करण्यास समर्थ झाल्या असल्याचे नमूद करून युवतीसभा प्रमुख डॉ. सौ पी. एम. रावतोळे यांचे यशस्वी आयोजन बद्दल आभार मानले. 

     या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु. वैशाली जोशी व आभार प्रदर्शन कु. प्रियांका धनगर    यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ. क्रांती क्षीरसागर (जिमखाना विभाग),डॉ. एच. जी. सौ. एस. बी. पाटील, सौ. संगीता पाटील, कु. स्नेहा राजपूत, सौ. पूजा पुन्नासे, कु. किरण शेलार, कु. पूनम महाजन, श्री. रवीभाऊ पाटील, श्री. सुधाकर बाविस्कर, श्री प्रताप पाटील, श्री. प्रदीप बाविस्कर व हनुमंत पाटील   यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध