Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
हजारों जनसमुदायच्या साक्षीने राष्ट्रवादीचे जगदीशचन्द्र वळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
हजारों जनसमुदायच्या साक्षीने राष्ट्रवादीचे जगदीशचन्द्र वळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
चोपडा:प्रतिनिधी:विनोद निकम चोपडा विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस आय, रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) तसेच मित्र पक्षाचे उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आज दि ०१/१०/२०१९ रोजी दुपारी २;३० वाजता नामनिर्देशन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे मॅडम यांच्या कडे भरला यावेळी त्यांच्या सोबत महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर , माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादीचे नेते गफारभाई मलिक, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष छन्नू झेंडू पाटील ( गोरख तात्या) काँग्रेस (आय) चे जिल्हा अध्यक्ष ऍड संदीप भैय्या पाटील, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ मनीषा चौधरी , पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी , महिला नेत्या विजयाताई पाटील, नीलिमा पाटील, नगरसेविका , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील आदीसह हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता
तत्पुर्वी राष्ट्रवादीचा मेळावा गो.भी. जीनिंग सुंदर गढि रोड चोपडा येथे सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहून आपल्या भाषणात जगदीशचंद्र वळवी निवडून येतीलच असा दावा सर्वांनीच केला यावेळी ऍड घनश्याम अण्णा पाटील, दिलीप तात्या पाटील,यांचा सह अनेकांनी आपल्या भाषणात भाजपा सरकार कसे अपयशी ठरले आणि आता परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे जगदीशचंद्र वळवी हे निश्चितच निवडून येतील असा दावा अनेकांनी केला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ऍड संदीप भैय्या पाटील यांनी सांगितले की सतर्क राहून आपण आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले काँग्रेस (आय ) चे, व राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर हजर होते राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानापासून वाजत गाजत आदिवासी पारंपारिक वाद्य वाजवत आदिवासी नृत्य करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गोलमन्दिर, मेन रोड, आझाद चौक, पाटील दरवाजा शिवाजी चौक,आंबेडकर चौक, मेन रोड वरून तहसील कचेरी वर मोठ्या जनसमुदाय समक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ,काँग्रेस (आय )चे व मित्र पक्षाचे सर्वच नेते , पदाधिकारी, व कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा