Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात कर्मचार्यांना रजासंदर्भात मार्गदर्शन वर्गाचे आयोजन
आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात कर्मचार्यांना रजासंदर्भात मार्गदर्शन वर्गाचे आयोजन
शिरपूर प्रतिनिधी : योगेश्वर मोरे
आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात कर्मचा-यांच्या रजा संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी रजा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते .
विद्यालयाचे प्राचार्य श्री. सिद्धार्थ पवार यांनी महाराष्ट्र खाजगी माध्यमिक शाळा कर्मचारी सेवेच्या शर्थी अधिनियम1981यातील नियम 16नुसार 16 , विविध प्रकाराविषयी मार्गदर्शन केले. त्यात किरकोळ रजा,विशेष नैमित्तिक रजा,अर्ध पगारी रजा / परिवर्तीत रजा, असाधारण रजा किंवा बिनपगारी रजा ,प्रसूती रजा , अर्जित रजा मोठ्या
सुटीपासून वंचित रजा ( मुख्याध्यापकांसाठी ) ,भरपाई रजा ,आजारपणाची रजा, अध्ययन रजा व ईतर रजा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळे कर्मचार्यांना कोणती रजा केव्हा घ्यावी याविषयी चांगले मार्गदर्शन मिळाले. विशेष म्हणजे वेगवेगळ्या आजारपणाच्या रजा अद्यापपावेतो कोणालाच माहित नसलेल्या रजा विषयी फार मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील पर्यवेक्षक श्री. बी. एस. जमादार , उपशिक्षक ए. जे. पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यालयाचे प्राचार्य सिद्धार्थ पवार यांचे आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा