शिरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत शिरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुक मतदान कर्मचारी प्रशिक्षण वर्गाचे दि.२ ऑक्टोबर रोजी शिरपूर शहरातील आर सी पटेल शैक्षणिक संकुलात (मुख्य इमारत) आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास उपविभागीय कार्यकारी अधिकारी व निवडणूक अधिकारी विक्रमसिंग बांदल यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य
विधानसभेसाठी सपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून शिरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नेमणुकीला असलेले मतदान झोनल अधिकारी,मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी मतदानापूर्वी ,प्रत्यक्ष मतदानवेळी व मतदानानंतर कसे काम करावे, मतदान यंत्र जोडणी,मतदान कक्ष आदी
विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी प्रत्यक्ष मतदान यंत्राचे भाग, VVPAT बद्दल माहिती त्याची जोडणी,मतदानानंतर सीलबंद करणे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.यावेळी तहसीलदार व निवडणूक सहाय्यक अधिकारी आबा महाजन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व निवडणूक सहाय्यक डॉ.अमोल बागुल,नायब तहसीलदार गणेश अढारी, निवडणूक झोनल अधिकारी,मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा