Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

२आकटोबर महात्मा गांधी जयंती व तंबाखू मुक्त शपथ २०१९








(१)प्रतिनिधी अजीज शेख रावेर: खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल ता.रावेर जि. जळगाव. येथे २आकटोबर महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती, तंबाखू मुक्त शपथ २०१९ अभियान राबविण्यात आले. त्या वेळी शाळाचे मुख्याध्यापक शेख निसार सर यांनी महात्मा गांधीचे जिवन जगत वर आधारित व तंबाखू सेवन मुळे होणारे दुष परिणाम, तंबाखू मुक्त शपथ घेताना माहिती विद्यार्थी समोर मांडले. तसेच कार्यक्रम चे सुत्र संचालन व आभार अजीम खान सर यांनी मानले. त्या वेळी शाळाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------------------------------
(२)महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमानी जि.प. शाळा नं. २ केऱ्हाळे बु.येथे उत्साहात साजरी 
----------------------------------------------

रावेर दि.२:प्रतिनिधी:150व्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त  व लाल बहादुर  शास्त्री जयंती  निमित्त जि प शाळा नंबर 2 केरहाळे बु़ येथे विविध उपक्रम घेण्यात आले सर्व प्रथम सुनिल महाजन यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच मुख्याध्यापक  रवींद्र तायडे  यांनी  महात्मा गांधीजींच्या  प्रतिमेचे पूजन केले  यावेळी  श्री  सुनील महाजन श्री  शांताराम विचवे श्री दिलीप सावळे यांनी  लाल बहादूर शास्त्री  यांच्याविषयी  सखोल माहिती  विद्यार्थ्यांना सांगितली तसेच मुख्याध्यापक  रवींद्र तायडे  व  मधुकर निळे  श्री याेगेश पाटील यांनी  महात्मा गांधीजी विषयी सखाेल असे मार्गदर्शन  विद्यार्थ्यांना केले  यावेळी विद्यार्थ्यांमधून कुमारी पूर्वा महाजन गायत्री सोनवणे चैताली सोनवणे रुचिका सुतार भुषण प्रजापती यांनीसुद्धा महात्मा गांधीजी विषयी व लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी माहिती सांगितली
प्लास्टिक मुक्ती व तंबाखूमुक्ती शपथ, स्वच्छता शपथ घेण्यात आली महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर वक्तृत्वस्पर्धा, व सर्व शालेय सफाई करण्यात आली. सदर प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती  उपाध्यक्ष  श्री  सुनिल रामचंद्र महाजन सर्व शिक्षक वृंद ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते .


-----------------------------------------------
रावेर ग्रामीण रुग्णालयात तंबाखू विरोधी दिन साजरा 
----------------------------------------------


रावेर प्रतिनिधी अजीज शेख  
येथील ग्रामीण रुग्णालयात 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून  राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत  रावेर ग्रामीण रुग्णालयात तंबाकू मुक्ती शपथ घेण्यात आली

या वेळी  ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ स्वप्निषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमा पूजन श्रीराम फौन्डेशन सचिव दीपक नगरे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ  प्रियंका  कडू यांनी प्रास्ताविकात तंबाखूमुळे होणारे आजार आणि त्यापासून होणारे दुष्परिणाम याविषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक  मुख्य अधिपरिचरिका कल्पना नगरे यांनी केले. आभार के.डी. झोपे यांनी मानले यावेळी कुशल पाटील, गणेश महाजन, अर्चना पाटील, शंकर भोई, गोविंद पवार, पी.एस गायकवाड, रफिक तडवी यांच्यासह रुग्णालयीन कर्मचारी आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक  उपस्थित होते।

-----------------------------------------------
 रावेर यथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुत्क जयंती साजरी 
-----------------------------------------------


रावेर प्रतिनिधी अजीज शेख:दि. २/१०/ २०१९ रोजी .  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर सार्व वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेसे नगराध्यक्ष दारा मो. जफर मो.  व  माजी. नगराध्यक्ष हरीषशेठ गनवाणी यांचे हस्ते माल्यार्पण करून पुजन करण्यात आले , संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदिश घेटे यांनी प्रस्ताविक केले या कार्यक्रमास कामगार नेते दिलीप कांबळे अजबराव पाटील साहेब  , जनता बँकचे  चेअरमन एल.डी. निकम  मा.जिल्हाअध्यक्ष युवक काँग्रेसचे पंकज वाघ , शाहु फुले आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र 

अटकाळे,नगरसेवक  सुर्यकांत अग्रवाल संस्थेचे संचालक दशरथ घेटे, अशोक घेटे,  संघरक्षक तायडे ,विलास लाहासे, नरेंद्र पाटिल  मयुर गढे सम्यक इंगळे, ज्ञानेश्वर घेटे, प्रविण घेटे, अनिल घेटे, अशोक इंगळे, इ . वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रंथापाल निलेश तायडे, यांनी आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध