Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९
प्लास्टिक मुक्त व स्वच्छ चिकुंद्रा करण्याचा गावकऱ्यांचा निर्धार
प्रतिनिधी विशाल डुकरे:आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग व टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर यांच्या विद्यमाने चिकुंद्रा गावात प्लास्टिक मुक्त गाव प्रकल्प व स्वच्छ गाव अभियान चालू करण्यात आले, देशाचे पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक मुक्त भारताची घोषणा केल्यानंतर प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा निर्धार करणारा उस्मानाबाद जिल्ह्यातील चिकुंद्रा हा पहिला गाव ठरणार आहे. शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. नदी, नाले तुंबले की त्या परिसरातील लोकांना मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्लास्टिकचे दुष्परिणाम हे एकंदरीतच मानवी आयुष्यासाठी भयावह आहेत.
3 ऑक्टोबर रोजी प्लास्टिक मुक्त गाव अभियानाची सुरुवात करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्राथमिक स्वरूपात पाच कचराकुंडी च लोकार्पण गावचे सरपंच राणबा जाधवर, साहित्यिक माधव गरड, आरंभ ब. सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, हरिदास बेले मुख्याध्यापक महाबोले सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबद्दल तसेच प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम याबाबत पथनाट्य सादर केले व येत्या काळात चिकुंद्रा गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्णय करून जिल्ह्यात पहिला प्लास्टिक मुक्त करण्याचा मान मिळविण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिद्धी पोळ यांनी तर सूत्रसंचालन सत्यवान गायकवाड आणि आभार पुरुषोत्तम बेले यांनी मानले. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रशिक्षणार्थी इंद्रजित गायकवाड, आनविशा पांडे, अंकिता गुनावत, अनिशा बोर्गोहेन, सिद्धी पोल, आशिष कर्णावत यांना संस्थेच्या वतीने चिकुंद्रा गावात करत असलेल्या प्रकल्पासाठी व इतर उपक्रमासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले. याकार्यक्रमास आरंभ संस्थेचे उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, मयूर महाबोले, सुमित यादगिरे, केशर जाधवर, नजीर शेख, नितीन मोटे, सौदागर गायकवाड, परमेश्वर एकंडे, एम. डी. गरड आदी आरंभ संस्थेचे सदस्य, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रशिक्षणार्थी, गावकरी व शालेयविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा