Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

खान्देशात भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची रड –बोबंल





खान्देशात भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची रड –बोबंल  


BY ऑनलाईन तरुण गर्जना
October 2, 2019
पंकज पाटील (उपसंपादक)


  • सत्तर वर्षापासून हाती झेंडा घेवून फिरणारे कार्यकर्ते हताश
  • पक्ष वाढवण्याच्या नादात निष्ठावंत कार्यकर्त्यांची गळचेपी .
उत्तर खान्देश  हा भारतीय जनता पार्टीचा बाल्ले किल्ला म्हणून ओळखला जातो .खान्देशमध्ये भारतीय जनता पार्टीचे पायमूळ रोवण्यासाठी एकनाथराव खडसे यांनी जीवाचे रान केले.विरोधी पक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना त्यानी कधीही पक्षाची बाजू खाली पडू दिली नाही .विरोधी पक्ष नेत्याची दुरा सांभाळताना त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांच्याच काळात उत्तर महाराष्ट्रातील जलसिंचनाची कामे मार्गी लागलीत. आयुष्याची चाळीस वर्ष   पक्षाची जबाबदारी त्यांनी प्रामाणिक सांभाळली. त्यामुळे सन २०१४ साली त्यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात होते .त्याच नाथाभाउंचे नांव सन २०१९ च्या पहिल्या  उमेदवार यादीत नाही ?  ही उत्तर खान्देश वासियांसाठी अपमानास्पद वागणूक आहे.एकेकाळी विधानसभा गाजवणाऱ्या नाथाभाउना आज विना एबी फॉर्मचा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला.फॉर्म भरतांना कार्यालया बाहेर असलेले  कार्यकर्ते ढसा –ढसा.. ..रड –बोंबल करत होते.


 असाच  प्रकार शिरपूर तालुक्यात डॉ.जितेंद्र ठाकूर यांना विश्वासात न घेता करण्यात आला.काशिनाथ पावरा यांना भारतीय जनता पार्टीत जागा देत सामावून घेतले उद्या त्यांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट ही दिले जाईल .मग इतकी वर्ष ज्यांनी पक्षाचे अस्तित्व कॉंग्रेस पक्षाच्या बाल्ले किल्यात टिकवून ठेवले त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे काय ? तालुक्यात आज निष्ठावंत  कार्यकर्त्यांवर काय चुकल आमच ? या  व्यासपीठावर रड – बोमल करण्याची वेळ आली .


 तशीच काहीशी परिस्थितीती अमळनेर तालुक्यात पाहायला मिळाली.अमळनेर तालुक्यात ज्या वाघ दाप्त्यानी विध्यार्थी दशेपासून भारतीय जनता पार्टीचे काम करत पक्ष वाढवला .त्याच्या उत्कृष्ठ कारक्रीदीतच त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्ष पद व विधानपरिषद आमदारकीची पदे दिलीत .तालुक्यात त्यांच्या ताकदीचा दुसरा नेता नसल्याने त्यांनी खासदारकीसाठी आपली ताकद पणाला लावली पण त्यांच्या तालुक्यातील राजकारणात एकमेकाला पाय –खेचण्याच्या वृतीने त्यांच्या स्वप्नाचा  बळी घेतला .आज त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा आमदारकीचे तिकीट कापून झाली . त्यामुळे आज दिवसभर त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची रड-बोंबल सुरु होती.


 नाथाभाऊ , जिल्हाध्यक्ष उदय वाघ ,स्मिताताई वाघ यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे राजकारण मुख्यमंत्री यांचे विश्वासू व खास असलेल्या जिल्ह्यातील  नामदार भाऊंच्या माध्यमातून  चालू आहे.खान्देशची जनता या संकटमोचन भाऊंच्या विश्वास घाताला बळी पडते का ? का त्यांना संकटात टाकते हे येणाऱ्या निवडणुकीच्या  निकालातूनच   दिसून येईल  .


 खान्देश वासियांचे रडणारे अश्रू नितीन गडकरी यांच्या शब्दाला जागतात  का ? दलबदलू नेत्यांना त्यांची जागा दाखवतील का ? का पक्ष निष्ठा जपतात ?  हे येणारा काळच ठरवेल .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध