Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
ज्याप्रमाणे अकोला परळी ट्रेन परभणी पर्यंत चालविण्यात आली त्याच प्रमाणे भुसावल नागपुर पॅसेंजर वर्धा स्टेशन पर्यंत चालविण्यात यावी प्रवासी संघटनेची मागणी
ज्याप्रमाणे अकोला परळी ट्रेन परभणी पर्यंत चालविण्यात आली त्याच प्रमाणे भुसावल नागपुर पॅसेंजर वर्धा स्टेशन पर्यंत चालविण्यात यावी प्रवासी संघटनेची मागणी
शेगाव:प्रतिनिधी: रेल्वे प्रशासनाने ज्याप्रमाणेअकोला परळी ही ट्रेन परभणी पर्यंत चालविलि त्याच प्रमाणे भुसावळ नागपूर भुसावळ पॅसेंजर गाडी वर्धा स्टेशन पर्यंत चालवावी अशी मागणी प्रवासी संघटना शेगाव च्या वतीने करण्यात आली
आहे नागपूर रेल्वेस्थानकावर तांत्रिक कार्याकरिता गाडी संख्या 51285/86 भुसावळ नागपूर भुसावळ पॅसेंजर गाडी 9 जानेवारीपासून 2 फेब्रुवारी पर्यंत रेल्वे बंद ठेवणार आहे त्यामुळे शेगावला श्रींच्या दर्शनास निमित्त येणाऱ्या खेड्यापाड्यातील शेकडो प्रवाशांना त्रास सहन करून नाइलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागणार आहे श्री संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर असलेल्या संतनगरी शेगाव शहरात भुसावळ ते नागपूर दरम्यान येणाऱ्या लहान खेडे गावातील हजारो प्रवासी भुसावळ नागपूर पॅसेंजर गाडी ने शेगावला येत असतात मात्र जवळपास एक महिना51285/86 ही सर्वसामान्य प्रवाशांची असलेलीपॅसेंजर गाडीनागपूर रेल्वे स्थानकावरील काही तांत्रिक कार्य करण्याच्या नावाखाली बंद राहणार असल्यामुळे सामान्य प्रवाशांना नाहक भुर्दंड धारण करावा लागणार आहे
नागपूर रेल्वे स्थानकावरील तांत्रिक कार्य साठी ही पॅसेंजर बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळते भुसावळ ते नागपूर पर्यंत पॅसेंजर गाडी जोपर्यंत नागपूर रेल्वे स्थानकावरील तांत्रिक कार्य पूर्ण होत
नाही तोपर्यंत 51285/86 या क्रमांकाची पॅसेंजर गाडी भुसावळ पासून वर्धा रेल्वे स्थानका पर्यंत चालविण्यात यावी जेणेकरून भुसावळ ते वर्धा दरम्यान येणाऱ्या लहान खेड्यापाड्यातील रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळेल व रेल्वे विभागालाही आर्थिक उत्पन्न मिळेल अशी मागणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे या निवेदनावर अध्यक्ष शेखर नागपल एडवोकेट पुरुषोत्तम डांगरा विजयकुमार मिश्रा मयूर मुना अशोक भुतडा पत्रकार राजकुमार व्यास यांच्यासह प्रवासी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या सह्या आहेत मुख्य रेल्वे प्रबंधक मुंबई यांना पाठविलेल्या या निवेदनाच्या प्रती भुसावळ व नागपूर येथील रेल्वे विभागीय मंडळ अधिकारी प्रबंधक यांनासुद्धा पाठविण्यात आले आहेत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा