Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ जानेवारी, २०२०

सोमवार दिनांक सोमवार दिनांक सहा जानेवारी 2020 वेळ सायंकाळी सहा वाजता स्थळ गांधी चौक शेगाव पत्रकार दिन सोहळा.




प्रतिनिधी:शेगाव पत्रकार संघाचे शेगाव रत्न पुरस्कार जाहीर
उध्या पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे पार्श्वभूमीवर येथील शेगाव पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांना शेगाव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शेगाव शहर वर तालुक्यातील रहिवासी असलेल्या मान्यवरांनी पत्रकारिता क्षेत्रात ऋत्वा चा ठसा उमटवून शेगावचे नावलौकिक वाढविला. 

अशा मान्यवरांना शेगाव रत्न पुरस्कार देण्याचा निर्णय शेगाव पत्रकार संघाचे बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. शेगाव पत्र संघाचे बैठक संस्थापक अनिल उंबरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात नानासाहेब खेडेकर संपादक शिव संदेश शेगाव राजेश राजुरे आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती खामगाव, संदीप भारंबे निवासी संपादक दैनिक सकाळ, राजेश शेगोकार वृत्त  उपसंपादक दैनिक लोकमत, राजीव पिसे निवासी संपादक दैनिक भास्कर अकोला, राहुल पहुरकर वरिष्ठ संपादक लोकशाही न्यूज मुंबई इंगळे संपादक दैनिक विश्व जनाधार, विजय कुलकर्णी उपसंपादक दैनिक करून भारत खामगाव यांना शेगाव रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.यावेळी कार्यकारी समितीचे सदस्य नंदू कुलकर्णी यांनी पुरस्कारासाठी मान्यवरांचे निवडीचे ठराव मांडला.

तर शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन यांनी अनुमोदन दिले. बैठकीला समन्वय ज्ञानेश्वर कुकडे, संतोष पिंगळे, सचिन कडुकार, दिनेश घाटोळ, उमेश राजगुरे, बळीराम हिंगणे, देवचंद समदुर यांची उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन शेगाव पत्रकार  संघाचे सचिव अमोल बोरसे यांनी केले.

---------------------------------------------
शेगाव:प्रतिनिधी: पत्रकार दिनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर मैदान नामकरण सोहळा
पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील नगरपालिकेच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर मैदान नामकरण सोहळा 6 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित केला आहे. शेगाव पत्रकार संघाचे कार्यकारी समितीचे प्रमुख नंदू भाऊ कुलकर्णी यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक प्रभाग सहा मधील सुद्धा कॉटर्स परिसरातील मैदानाचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर असे नामकरण व सौंदर्य करण्याचे कामास नगर परिषद ने मंजुरात दिली आहे. हा नामकरण सोहळा पत्रकार दिनी सौ शकुंतलाताई यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.यावेळी उद्घाटक म्हणून भाजपा नगर परिषद गटनेते शरदशेठ अग्रवाल हे राहतील. तसेच उपाध्यक्ष ज्योतीताई कचरे, स्थायी समिती सदस्य पवन महाराज शर्मा, पाणीपुरवठा सभापती गजानन जवंजाळ, शिक्षण सभापती मंगेश ढगे, आरोग्य सभापती ज्योतीताई चांडक, महिला व बालकल्याण सभापती सौ छाया योगेश पल्हाडे, नगर परिषद सदस्य तसेच पत्रकार बांधवांची  उपस्थिती राहील. तसेच बांधकाम सभापती रत्नमाला ठवे, नगरसेविका सौ मंगला ताई कमलाकर चव्हाण,मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके तसेच शेगाव पत्रकार संघाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

***************************** शेगाव:प्रतिनिधी: शेगावात पत्रकार दिनाचा सोहळा ..
शेगाव रत्न पुरस्काराचे वितरण; समाजप्रबोधनपर कार्यक्रम 
शेगाव: येथील शेगाव पत्रकार संघाचे वतीने स्थानिक गांधी चौकात 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य पत्रकार दिनाचा सोहळा आयोजित केला आहे. 

त्याअनुषंगाने वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादकस्तरीय मान्यवरांना शेगाव रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. तदनंतर राष्ट्रीय कीर्तनकार सुशील महाराज वनवे यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार डाॅ संजय कुटे तर उद्घाटक म्हणून  आ. अॅड आकाश फुंडकर राहतील. तर पुरस्काराचे वितरण केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांचे हस्ते होईल.तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री डाॅ राजेंद्र शिंगणे तसेच बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन यांचाही यावेळी सत्कार करण्यात  येईल.यावेळी काॅग्रेसचे नेते माजी आ. दिलीपकुमार सानंदा,ज्ञानेश्वरदादा पाटील, सौ स्वातीताई वाकेकर , रामविजय बुरूंगले,तेंजेंद्रसिंग चव्हाण,  वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने,विठ्ठल पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख  शांताराम दाणे,राकाॅ जिल्हाध्यक्ष अॅड नाझेर काजी,भाजपा शहराध्यक्ष डाॅ मोहन बानोले, तहसीलदार शिल्पाताई बोबडे, शहर ठाणेदार संतोष ताले,ग्रामीण ठाणेदार गोकुळ सुर्यवंशी, न प मुख्याधिकारी डाॅ प्रशांत शेळके, 
मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष अरूण जैन, समाधान सावळे,सुधीर चेके पाटील,आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.

शेगाव रत्न पुरस्काराचे मानकरी....
जेष्ठ पत्रकार डाॅ नानासाहेब खेडकर संपादक दै शिवसंदेश, राजीव पिसे निवासी संपादक दै भास्कर ,राजेश राजोरे आवृत्ती संपादक दै देशोन्नती,संदिप भारंबे निवासी संपादक दै सकाळ, राजेश शेगोकार सहाय्यक वृत्त संपादक दै लोकमत , राहुल पहुरकर वरिष्ठ संपादक लोकशाही न्युज मुंबई ,विजय इंगळे संपादक सांज दै विश्वजनाधार,विजय कुलकर्णी उपसंपादक तरूणभारत यांना शेगाव रत्न पुरस्काराने गौरविण्यात येईल. 

सुशिलदादाची प्रबोधनवाणी ...
पुरस्कार वितरणानंतर  राष्ट्रीय किर्तनकार सुशिल महाराज वणवे यांचा तुफान विनोदी समाजप्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे. 
तरी वरील कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन  शेगाव पत्रकार संघाचे संस्थापक अनिल उंबरकर, अध्यक्ष दिनेश महाजन, सचिव अमर बोरसे,
नंदु कुळकर्णी, ज्ञानेश्वर कुकडे,संतोष पिंगळे, सचिन कडूकार,दिनेश घाटोळ, उमेश राजगुरे,बळीराम हिंगणे,देवचंद समदूर आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध