Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

समाजाने पत्रकारांचे पाठीशी उभे राहावे -शरद अग्रवाल आद्यपत्रकार बाळशास्री जांभेकर मैदान नामकरण शेगाव नगर परिषदेची तत्परता



शेगाव:प्रतिनिधी: पत्रकार हे सतत लोकांच्या हितासाठी झटतात,त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा न प भाजपा गटनेते शरदसेठ अग्रवाल यांनी केले.

पत्रकार दिनी येथील नगर परिषदेचे वतीने सुधा क्वार्टर परिसरातील मैदानाचा आद्यपत्रकार बाळशास्री जांभेकर मैदान नामकरण सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच होत्या.यावेळी  माजी नगरसेवक पांडुरंग बुच, किरणबाप्पू देशमुख,न प पाणी पुरवठा सभापती गजानन जवंजाळ,शिक्षण सभापती मंगेश ढगे, आरोग्य सभापती सौ ज्योतीताई चांडक,महिला व बालकल्याण सभापती सौ छाया योगेश पल्हाडे,नगरसेविका मंगलाताई,चव्हाण,  कमलाकर चव्हाण,रामेश्वर  राखोंडे,प्रमोद साठे,मनू कायंदे,मोने देशपांडे,अशोक गडकर,अशोक मालशे,गोपाल वर्मा, करण ठाकुर,विलास बोरचाटे,नंदु शर्मा, गोविंद कुळकर्णी, गणेश बापू, शेगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष देवानंद उमाळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

शेगाव पत्रकार संघाचे कार्यकारी समितीचे प्रमुख नंदु कुळकर्णी  यांच्या पाठपुरावा केल्याबद्दल येथील प्रभाग 6 च्या नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.प्रास्ताविक जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अनिल उंबरकार तर संचलन शेगाव पत्रकार संघाचे सचिव अमर बोरसे यांनी केले.शेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश महाजन यांनी आभार मानले.  

फोटो- शेगाव: नामफलक अनावरणप्रसंगी नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, गटनेते शरद अग्रवाल, नंदु कुळकर्णी  व पत्रकार बांधव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध