Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
"तारक मेहता का उलटा चष्मा" मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांची आज दि. 24 रोजी शिरपूर व धुळे येथे उपस्थिती
"तारक मेहता का उलटा चष्मा" मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांची आज दि. 24 रोजी शिरपूर व धुळे येथे उपस्थिती
शिरपूर:प्रतिनिधी:धुळे येथे श्री विले पार्ले केळवणी मंडळ संचलित एस.व्ही.के.एम. सीबीएसई स्कूल मध्ये शुक्रवारी दि. 24 जानेवारी रोजी “स्वप्न” या थीम वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम मोठया दिमाखदार स्वरुपात संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण "तारक मेहता का उलटा चष्मा" या प्रसिद्ध मालिकेतील सुप्रसिद्ध कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांची उपस्थिती राहील.
सुप्रसिद्ध कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी हे शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी मुंबई येथून इंदूर विमानतळावरील येतील. तेथून कारने प्रवास करून शिरपूर येथे त्यांचे प्रस्थान होईल. माजी मंत्री अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध असल्याने जेठालाल हे शिरपूर येथे येत आहेत. शिरपूर येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संस्था व एस. व्ही. के. एम. संस्थेला सदिच्छा भेट देवून पाहणी करतील. त्यानंतर ते धुळे येथे एस. व्ही. के. एम. सीबीएसई स्कूल च्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सायंकाळी 6 वाजता उपस्थिती देतील.
सुंदर वेशभूषा, नटून थटून आलेले बालकलाकार, भव्य रंगमंच, अप्रतिम लाईटींग व्यवस्था, अतिशय सुंदर बैठक व्यवस्था, पालकांची ठेवलेली सन्मानपूर्वक व्यवस्था........अशा सर्व सुनियोजित व्यवस्था व कार्यक्रमामुळे सर्वांचे डोळयांचे पारणे फिटेल असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. सुनंदा मेनन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा