Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना पीकविमा मिळण्यासाठी आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 29 रोजी दुपारी धडकला मोर्चा, तातडीने लाभ देण्याची मागणी,
शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना पीकविमा मिळण्यासाठी आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 29 रोजी दुपारी धडकला मोर्चा, तातडीने लाभ देण्याची मागणी,
कृषी विभाग व पिक विमा कंपनी यांची चौकशी करण्याची मागणी
शिरपूर – पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत शिरपूर तालुक्यातील 12,541 लाभार्थी पिक विमा धारक शेतकरी बांधवांना व 410 फळ पिक विमा धारक लाभार्थी शेतकरी बांधव यांना तातडीने पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 29 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मोर्चा धडकला. यावेळी सर्व शेतकरी बांधव यांना तातडीने योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील पिकनिहाय बाधित शेतकरी संख्या 12,541 आहे. कापूस 6801 शेतकरी, मूग 2305, मका 1129, उडीद 897, ज्वारी 634, बाजरी 291, सोयाबीन 404, भुईमूग 31, तूर 33, तीळ 3, कांदा 16 असे एकूण 12,541 शेतकरी बांधवांना तसेच फळ पिक बाधित शेतकरी बांधव 410 आहेत.
सर्व शेतकरी बांधवांना शासनाकडून तातडीने त्यांची पिक विमा रक्कम मिळावी यासाठी आमदार काशिराम पावरा यांच्या वतीने दि. 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना दिलासा न मिळाल्यास मोर्चा काढण्यात येईल असे कळविण्यात आले होते.
त्यानुसार शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नसल्याने दि. 29 रोजी शेकडो शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून आपल्याला तातडीने पिक विमा मिळावा यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करण्यात आला.
शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 29 जानेवारी रोजी मोर्चा धडकला.
इतर जिल्हा प्रमाणे धुळे जिल्ह्यातील व शिरपूर तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव यांना न्याय मिळावा, तातडीने नुकसानभरपाई, पिक विमा योजना लाभ तात्काळ द्यावा, कृषी विभाग व पिक विमा कंपनी यांची देखील चौकशी या निमित्ताने करावी अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार काशिराम पावरा व उपस्थित सर्व पदाधिकारी, शेतकरी यांनी केली. योग्य ती मदत करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी दिले.
यावेळी आमदार काशिराम पावरा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के डी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शिरपूर साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, जिल्हा परिषद सदस्य भरत पाटील, जगन्नाथ महाजन, दर्यावसिंग जाधव, सुनील जैन, बोराडी येथील राजेंद्र पाटील, जगन पावरा, रमण पावरा, बाजार समिती संचालक अविनाश पाटील, बभळाज येथील अविनाश पाटील, भुपेंद्रसिंह राजपूत, जयसिंग राजपूत, विजय पारधी, लाला गिरासे, आकाश मराठे, दीपक पावरा, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या वर्षी 8 कोटी 6 लाख रुपयांचा फळ पिक विमा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झाला होता. यांतील पहिल्या हप्त्याचे 4.03 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यांवर जमा झाले होते.
पंतप्रधान फळ पिक विमा योजना अंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना 2018-19 मध्ये “आंबिया बहार” साठी लागू करण्यात येवून महाराष्ट्र शासनाच्या वतीने व ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मार्फत गेल्या दीड महिन्यांपूर्वी फळ पिक विमा मंजूर करण्यात आला होता. या विक विमा योजनेतून केळी पिकाचे 403 लाभार्थी शेतकरी बांधव, पेरु पिकाचे 1 व डाळींब पिकाचे 6 लाभार्थी असे एकूण 410 लाभार्थी शेतकरी बांधवांना प्रत्येकी प्रति हेक्टर रु. 66,000 प्रमाणे पिक विमा रकमेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. 4 कोटी 3 लाख रुपये एवढी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झाली असून उर्वरीत दुसरा हप्ता रु. 66,000 चा मिळणे बाकी आहे. उर्वरीत रक्कम लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी देखील आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने 9 कोटी रुपये पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांना प्राप्त झाली होती.
यावर्षी मात्र पिक विमा मिळण्यात होणारी दिरंगाई शेतकरी बांधवांसाठी खूपच मारक ठरली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा