Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३० जानेवारी, २०२०
मुंबईत रेल्वे वाहतूक विस्कळीत, तर धुळे आणि यवतमाळ येथे हिंसक वळण
सीएए आणि एन्.आर्.सी. यांच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाचा ‘भारत बंद’
देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली असतांना बंद पुकारणे, हे राष्ट्राची आर्थिक हानी करणारे आहे. बंदच्या काळात झालेल्या आर्थिक हानीची प्रशासन आणि पोलीस यांनी आंदोलनकर्त्यांकडूनच वसुली करायला हवी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
मुंबई:प्रतिनिधी:बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि अन्य काही संघटना यांच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) अन् ‘ईव्हीएम्’ यांना विरोध करण्यासाठी २९ जानेवारी या दिवशी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली होती.
व्यापार्यांना दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने अनेक व्यापारी संघटनांनी पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन बंदोबस्ताची मागणी करत ‘बंद’ला विरोध दर्शवला. या बंदचा परिणाम म्हणजे मुंबईत रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली, तर धुळे आणि यवतमाळ येथे हिंसक वळण लागले. पालघर शहरात तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता.
मुंबईत रेल्वे प्रवाशांचे हाल
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात ‘रेल्वे बंद’ आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. कार्यकर्त्यांनी रुळांवर उतरून सीएएच्या विरोधात घोषणा दिल्या आणि गाड्या थांबवल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रुळांवरून बाहेर काढले. ऐन गर्दीच्या वेळी धिम्या मार्गावरील वाहतूक २० मिनिटे विलंबाने चालू झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
धुळे आणि यवतमाळ येथे बंदला हिंसक वळण
धुळे – चाळीसगाव रस्त्यावर आंदोलकांनी पोलीस उपअधीक्षकांच्या गाडीवर दगडफेक केली. खासगी वाहनांची जाळपोळ केली, तसेच बसवर दगडफेक करून प्रवाशांनाही मारहाण केली. २ बसगाड्यांची तोडफोड केली. आंदोलकांना नियंत्रणात आणतांना २ पोलीस अधिकारी आणि १० पोलीस कर्मचारी घायाळ झाले.
पोलीस उपअधीक्षकांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यासह अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर शहरात आणि संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यवतमाळ – आंदोलकांनी दुकानांत घुसून दुकाने बंद करण्यासाठी बळजोरी करत सामानांची नासधूस केली. त्यानंतर व्यापार्यांनी आंदोलकांवर मिरचीची पूड फेकली. येथेही आंदोलनाला हिंसक वळण लागले असून पोलिसांनी आंदोलकांना लाठीमार केला.
पुणे – येथे २५० पेक्षा अधिक आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. शहरात सारस बागेसमोर ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.
संभाजीनगर – अनेक ठिकाणी तिरंगा घेऊन निदर्शने करण्यात आली. खुलताबाद येथे पूर्ण बंद पाळण्यात आला. तसेच येथील देहली गेट येथे एस्.टी. बसला अडवणार्या जमावाने साहाय्य पोलीस निरीक्षकासह अन्य पोलिसांना मारहाण केली. या वेळी जमावाने पोलिसांकडील ‘व्हिडिओ कॅमेरा’ही फोडला.
सोलापूर – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. विजापूर वेस परिसरातील दुकाने बंद होती. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी १ घंटा बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर लिलाव प्रक्रिया चालू करण्यात आली.
सांगली – येथे बळजोरीने दुकाने बंद करणारे आंदोलक, तसेच व्यापारी यांच्यात वादावादी झाली. मिरज येथे काही आंदोलकांनी रिक्शाच्या काचा फोडून बळजोरीने रिक्शा वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तोडफोड करणार्यांना कह्यात घेतले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा