Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
दि.3/1/2020 धुळे.अभय माध्यमिक विद्यालय,धुळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
दि.3/1/2020 धुळे.अभय माध्यमिक विद्यालय,धुळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
धुळे:प्रतिनिधी:येथील अभय युवा कल्याण केंद्र धुळे येथे आज दिनांक 3/1/2020 रोजी क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.सावित्रीबाईंनी स्रीयांना फक्त चुल आणि मुल या गुरफटलेल्या जिवनातुन खरी मुक्ती देत स्रियांना शिक्षणाची दार मोकळी केली.
त्यांना शिक्षणाच महत्व पटवुन देत पुर्वी आपला नवरा मेला तर त्याच्या पत्नीला देखील सती जावे लागे.
जिवंतपणी अग्नीमध्ये स्वाहा होणारी स्री मुक्त व्हावी यासाठी सावित्रीबाई अशिक्षीत असुनही त्यांनी शिक्षणानेच महिलांचा खरा उध्दार होईल या हेतुने त्यांना ज्योतीराव फुलेंनी शिकवले व सावित्रीबाईंनी त्याच प्रेरणेतुन महिलांना,मुलींना शिक्षणाचे धडे दिले.आणि यातुनच सति जाणारी तेव्हाची स्री सावित्री बाईंनी मुक्त केल जुन्या चाली रिती बदलवुन टाकल्या समाजाचा स्रीयांना शिकवण्याचा प्रचंड विरोध असतांना सावित्रीबाईंनी कमी वयात शिक्षीका झाल्या.व पुण्यात मुलींसाठी शिकण्यासाठी पहिली शाळा काढली.आज त्यातुन अनेक स्रीया सावित्री बाईंच्या त्या पुण्याईने जगावर महत्वाच्या ठिकाणी महिला आघाडीवर काम उत्तम प्रकारे सांभाळण्याचे धाडस करतांना दिसत आहैत.
विद्यालयातील मुलींनी सावित्री बाई फुलेंची कतृत्वातील घटना आपल्या भाषणातुन पटवुन दिल.विद्यालयाच्या मुख्याध्यापक बापुसाहेब श्री.मनिष धात्रक यांनी सावित्री बाई फुलेंच्या प्रतीमेस पुजन करुन पुष्पहार अर्पण केला.
आणि विद्यालयातील सर्व महिला शिक्षीकांना आज सन्मानाने व्यासपिठावर बसवुन कार्यक्रम महिला शिक्षीकांनीच प्रतिनिधीत्व करण्यास संधी दिली.यात जेष्ठ शिक्षीका श्रीमती.एस.बी.पाटील,श्रीमती एन.एन.पाटील,श्रीमती थोरात एस.जी,श्रीमती बोरसे जे.एम यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एम.ए.पाटील यांनी केले.
तर शिक्षक प्रतिनीधींमधुन पर्यवेक्षक आबासाहेब श्री.आढावे.एन.बी यांनी सावित्रीबाईंबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.सैंदाणे ए.झेड,श्री पाठक आर.डी,श्री.बोरसे
एस.एल,श्री.पी.जी.साळुंके,श्री.वाय झेड पाटील,श्री.किरण पाटील,श्री आर.टी.बाविस्कर,श्री.भामरे आर.जे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता राट्रगीताने झाली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा