Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

मराठा सेवा संघाच्या वतीने प्रा.मारोती बुद्रुक यांचा सत्कार. सिंदखेड राजा येथे सन्मान.



अहमदपूर:प्रतिनिधी:गजानन आनंतवाळ
जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने मातृतिर्थ जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा बूलढाणा येथे जगद्गुरु तुकोबाराय प्रबोधन प्रतिष्ठानचे संस्थापकअध्यक्ष  प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना  स्मृतीचिन्ह,गौरवपत्र तथा पुष्पगुच्छ देवून सन्मान  करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यासाठी व कर्नाटकातही मराठा क्रांती मोर्चाची ऑडिओ जाहिरात विभाग सांभाळल्याबद्दल तसेच राष्ट्रीय कार्यासाठी  51वेळा रक्तदान,पथनाट्य,व्याख्यान,प्रवचन,व्यसनमुक्तीसाठी समाजप्रबोधन,गरीब व गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप केल्याने मराठा सेवा संघाच्या वतीने देशभरातील आलेल्या समाज बांधवांच्या साक्षीने जिजाऊ जयंतीच्या दिनी सिंदखेडराजा येथे सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय घोगरे,कार्याध्यक्ष अर्जूनराव तनपूरे यांच्या हस्ते राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला व पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध