Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुलीने केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण पित्याचा अंत्यसंस्कारात मुलीने दिला पित्याला अग्निडाग
मुलीने केली वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण पित्याचा अंत्यसंस्कारात मुलीने दिला पित्याला अग्निडाग
नांदुरा:प्रतिनिधी:येथील मोहनलाल टावरी यांचे दि 7 जाने ला दुख:द निधन झाले त्यांच्या प्रेताला त्यांची मुलगी अंकिता हिने मुखाग्नी देऊन आपल्या वडीलाची इच्छा तर पुर्ण केलीच परंतु समाजात स्त्री-पुरुष समानतेचा आर्दशही घालुन दिला.
या समाजात महिलांना किंवा मुलींना अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये जाण्यास मनाई केली जाते, अशा समाजातील एका कन्येने आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. माहेश्वरी समाजाच्या मुलीने पित्याच्या अंत्यसंस्कारात अग्निडाग देण्याचा प्रकार प्रथमच नांदुरा शहरात घडला असावा.वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असतांना यावेळी चितेस अग्नी कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला.
वडिलांचे छत्र हरपल्याचे दु:ख बाजूला सारत अंकिता हिने स्वत:च वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
नांदुरा शहरातील मोहनलालजी रामगोपालजी टावरी यांना पुत्र नाही म्हणून पुत्र समजून मोहनलालजी यांना त्यांची मुलगी अंकिता हिने मुखाग्नी देऊन परंपरागत रुढींना फाटा देऊन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आणि वडिलांची अंतिम इच्छाही पूर्ण केली.
मोहनलालजी टावरी यांचे 7/1/2020 मंगळवार ला हृदयविकाराच्या आजाराने दु:खद निधन झाले त्यांना मुलगा नसून अंकिता नावाची मुलगी आहे.
माझ्या प्रेताला खांदा,पाणी आणि मुखाग्नी माझ्या मुलींनीच द्यावे अशी इच्छा मोहनलालजी यांनी व्यक्त केली होती दि 8 जाने रोजी त्यांची अंत्ययात्रा खामगाव रोडवरील त्यांच्या निवासस्थानावरुन निघुन नांदुरा येथील स्मशानभुमीत पोहचली तेव्हा त्यांच्या प्रेता सोबत त्यांची मुलगी अंकीताही होती घराण्याला कुलदीपक म्हणून तसेच शेवटच्या क्षणी अग्न
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा