Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ११ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
केवायसीच्या नावाने फसवणूक एअरटेल सिमकार्ड विक्रेत्याच्या मनमानी कारभार केवायसी चा गैरवापर, ग्राहकांची सुरक्षा वाऱ्यावर
केवायसीच्या नावाने फसवणूक एअरटेल सिमकार्ड विक्रेत्याच्या मनमानी कारभार केवायसी चा गैरवापर, ग्राहकांची सुरक्षा वाऱ्यावर
कुरखळी: प्रतिनिधी:योगेश्वर मोरे
केवायसी हा वयक्तिक माहितीच्या सुरक्षेसाठी एक अविभाज्य घटक (पर्याय) असून त्याचा बाजारात सर्रास दुरुपयोग होत असतो.
आयडिया, व्होडाफोन, जिओ, एअरटेल यासह अन्य कंपनीच्या मोफत सिमकार्ड खरेदी करतांना आधारकार्ड आवश्यक असल्याने आपल्या बँकेशी संलग्न असलेले तेच आधारचा कश्याप्रकारे दुरूपयोग होतो ह्याची प्रचिती होळनांथे येथील व्यावसायिकाला आला व त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
होळनांथे येथील आठवडे बाजारात स्टॉल लावून एअरटेल सिमकार्ड विक्रेत्याच्या मनमानी कारभार चालु असुन केवायसीच्या नावाने आधार कार्डाचा गैरवापर करुन बेकायदेशीररित्या परस्पर दुसऱ्या ग्राहकांना सिमकार्ड विकण्याचे प्रकार होत असून ग्राहकांचा केवायसीचा गैरवापर करणाऱ्या विरुद्ध थाळनेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की बभळाज ता. शिरपुर येथील कैलास मोरे याने होळनांथे येथील योगेश पाटील यांच्या आधार कार्डवर सिमकार्डचे रजिस्टर करुन ते परस्पर दुसऱ्या ग्राहकांना बेकायदेशीररित्या विकल्याचे समजले, त्यावरून योगेश पाटील यांनी कैलास मोरे असे सिमकार्ड विक्रेत्याचे नाव असून याच्या विरुद्ध थाळनेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे .
याबाबत पोलिसांनी कार्यवाही करून जनतेला योग्य तो न्याय द्यावा व आपली वयक्तिक माहितीचा गैरवापर होण्यावर प्रतिबंध घालावा अशी मागणी योगेश पाटील व होळनांथे ग्रामस्थांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा