Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०
ऐनपूर महाविद्यालयास मतदार जनजागृती निमित्ताने उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार.
प्रतिनिधी:रावेर:येथून जवळच ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयास उपविभागीय अधिकारी कार्यालय फैजपूर यांच्या मार्फत मतदार जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन परिसरात जनजागृती केल्याबद्दल उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरवण्यात आले
तर महाविद्यालयातील प्रा हेमंत बाविस्कर यांना नोडल आँफीसर या नात्याने सन्मान पत्र देवुन गौरवण्यात आले जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे कुलगुरू प्रा पी पी पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
महाविद्यालयाचा गौरव झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील, चेअरमन श्रीराम पाटील , सचिव संजय पाटील तसेच संचालक विकास महाजन,पी आर चौधरी, डॉ सतिष पाटील,पी एम पाटील, एन व्ही पाटील, विजय पाटील, जगन्नाथ पाटील, हरी पाटील, डॉ गंभीर पाटील,आर एस पाटील, वासुदेव पाटील, रामदास महाजन,प्रविण महाजन, सुदेश पाटील, युवराज पाटील यांनी प्राचार्य डॉ जे बी अंजने, नोडल अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.
फोटोत कुलगुरू पी.पी पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतांना प्रा.एच.एम.बाविस्कर
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा