Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०
रावेर मॅरेथॉन मध्ये अश्विनी काटोले चा सत्कार
प्रतिनिधी:रावेर: येथे दरवर्षी प्रमाणे प्रजासत्ताक दिन निमित्ताने अंबिका व्यायाम शाळे तर्फे घेण्यात आलेल्या विभागस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा 27 जानेवारी ला घेण्यात आली पाच किलोमीटर महिला मॅरेथॉन स्पर्धेत मूळ राहणारी सिरसोली ची अश्विनी काटोले प्रथम आली,
या निमित्ताने अश्विनी काटोले चा रावेर येथील सुर्यवंशी बारी समाज बहुउद्देशीय संस्था, नागवेल युवा फाउंडेशन व सुर्यवंशी बारी समाज महिला मंडळ यांचे तर्फे सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अंबिका व्यायाम भास्कर महाजन तर प्रमुख पाहुणे समाजाचे अध्यक्ष भागवत अस्वार संस्थेचे उपाध्यक्ष ताराचंद बारी संस्थे चे विषवस्त सुधाकर अस्वार भागवत बारी (कालू सेठ) राजेंद्र कोल्हे रमेश बारी वधू वर मेळाव्याचे अध्यक्ष योगेश पाटील महिला मंडळ च्या उपाध्यक्ष राधिका बारी सचिव कविता पाटील सल्लागार सुशीला बारी उज्वला बारी परिक्षक जयंत चौधरी हे होते कुमारी अश्विनी नामदेव काटोले हिला संस्थे मार्फत एक हजार व नागवेल युवा फाउंडेशन तर्फे पाचशे रुपये चे बक्षिस देण्यात आले,
अश्विनी ने मनोगत मांडताना ती म्हणाली की आपल्या समाजातील महिला किंवा मुलींनी कुठली स्पर्धा ही अशक्य नाही आपण जिंकू शकतो त्या साठी फक्त मेहनत घ्यावी लागते असे त्यांनी मनोगत मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशन चे अध्यक्ष राहुल अस्वार यांनी केले तर आभार संदीप बारी यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज बारी चेतन बारी पराग बारी प्रमोद चौधरी गणेश बारी रत्नप्रभा पाटील यशोदा बारी कविता पाटील यांनी केले व सर्व समाज बंधू भगिनी उपस्तीत होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा