Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०
प्रजासत्ताक दिनी
प्रजासत्ताक दिनी वाॅटर कप विजेते नगांव खु॥ गावाची जिल्हा परिषदेची शाळा (२ टीव्ही) व अंगणवाडी (१ टीव्ही) आता झाली
तालुक्यात नव्हे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ६५" इंची टीव्हीसह डिजिटल शाळा, येथील विद्यार्थी घेतील आता स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे...
जिल्हा परिषदची शाळा व अंगणवाडी म्हटले की नाक मुरडले जाते. मात्र, नगांव खु॥ जि.प.शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही शाळेत यावेसे वाटेल. त्याला कारण तसे खासच आहे...
जळगांव जिल्ह्या व अमळनेर तालुक्यातील नगाव खु॥ या छोट्याश्या गावात ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळेला ६५" इंची २ टीव्ही ज्यात १ ली ते ७ वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमासह व अंगणवाडीला ६५" इंची १ टीव्ही ज्यात खेळ व बालगीतांच्या अभ्यासक्रमसह शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. खासगी शाळांच्या तोडीस ह्या शाळा बनवण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या या डिजिटल शाळेत व अंगणवाडीत स्मार्ट टीव्हीवर शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यीही आनंदाने शिक्षण घेताना दिसता आहेत...
खासगी शाळा आणि सध्या भरमसाठ फी घेणाऱ्या इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. मात्र नगांव खु॥ गावातील जिल्हा परिषद शाळा ही आदर्श जि.प शाळा म्हणून जिल्हाभरात नावारूपास येत आहे...
नगांव खु॥ या गावातील जिल्हा परिषद शाळा कौतुकाच विषय बनण्याचं कारण ही तसच आहे. आपण या शाळेच्या परिसरात प्रवेश केला तर आपल्याला वाटणार ही नाही की आपण जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करतोय.
कारण प्रवेश करताच संपूर्ण शाळेचा परीसर हा शिक्षकांच्या नियोजनाने व विद्यार्थ्यांच्या श्रमाने गावातील सांडपाण्यावर जगवलेला मोठमोठ्या झाडांनी व फुलझाडांनी व्यापलाय त्यामुळे पक्षी व फुलपाखरूंच्या सहवासातील येथील वातावरण बाराही महीने एकदम प्रफुल्लित व शांत असते. भिंतीवर महापुरुषांचे कार्य, गणिताचे पाठ, मराठी-इंग्रजी महिने, इंग्रजी बाराखळी, टीव्हीवर पाहतात ते कार्टून्स, शालेय धडे हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे म्हणून गिरवले गेले आहेत.
बाहेरून कुठून ही वाटत नाही की ही जिल्हा परिषद शाळा आहे. खासगी शाळेत भरमसाठ फी घेऊन ही इतक्या साऱ्या सुविधा दिल्या जात नाही तितक्या सरकारी शाळेत आहेत...
जि.प. शाळा व अंगणवाडीच्या नविन डिजिटल युगाला २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सुरूवात झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना ताईसो.सौ. प्रेरणा सुशीलकुमार बोरसे (प्रथम लोकनियुक्त सरपंच) यांनी नगांव खु॥ ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देत मार्गदर्शन केले...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा