Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

शहरातील शंभरफुटी रस्त्यावर पोलिसांवर हल्ले करून शहरात दहशत निर्माण करणारऱ्या समाज कंटकांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी



धुळे. प्रतीनिधी:काल शहरातील शंभरफुटी रस्त्यावर दुचाकी जाळून दगडफेक करण्यात आली या आंदोलनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना टार्गेट करून एक प्रकारे शहरातील जनतेवर दहशत निर्माण करण्याचा शुभारंभ काल शंभर फुटी रस्त्यावर झालेल्या प्रकरणातून दिसत आहे 



देशात लोकशाही आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे परंतु आंदोलन करून अशाप्रकारे आंदोलकांनी सरळ-सरळ पोलिसांना टार्गेट करून शहरातील जनतेवर दहशत बसवण्याचा प्रकार यापूर्वी या शहरात अशा प्रकारे कधीच झाला नाही किंबहुना कोणी करण्याचा प्रयत्न देखील केला नाही शहराला काळेमापा फासणारी घटना घडली आहे 

शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना व सर्व शाळा सुरू असताना अचानकपणे दंगल माजवून सरकारी व खाजगी मालमत्तेचे नुकसान करून पोलिसांवर हल्ले करणाऱ्या समाजविघातक शक्तीना वेठीस ठेवणे आवश्यक आहे या समाजकंटकांवर कोणत्याही दबावाविना कडक कारवाई तात्काळ करण्यात यावी यापुढे अश्या प्रकारचे पोलिसांवरील हल्ले आणि शहरात दहशत खपवून घेतली जाणार नाही समाजकंटकांचे मोबाईल रेकॉर्डिंग काढण्यात यावी ह्यावरून खरे सूत्रधार जनतेसमोर येतील पोलीस बांधवांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे संपूर्ण धुळेकर जनता पोलीस बांधवांच्या पाठीशी आहे 

शहरातील प्रत्येक शिवसैनिक पोलीसांना व जिल्हा प्रशासनाला मदत करेल कोणतीही तमा न बाळगता समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या साठी शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालया जवळ निदर्शने करण्यात आले

यावेळी अतुल सोनवणे, धीरज पाटील, संजय गुजराती, नरेंद्र परदेशी, डॉक्टर सुशील महाजन, बबन थोरात, राजेंद्र पाटील, मोरे किरण जोंधळे, पंकज बाविस्कर, सुनील चौधरी, महादू गवळी, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, किशोर काळे, संजय पाटील, गणेश काकडे,देविदास लोणारी प्रफुल्ल पाटील पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध