Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

अभय माध्यमिक विद्यालय धुळे येथे राजमाता जिजाउ व स्वामी विवेकानंद जयंती एकत्रीत साजरी




धुळे:प्रतिनिधीअभय युवा कल्याण केंद्र,धुळे संचलित अभय माध्यमिक विद्यालय,धुळे येथे राजमाता जिजाउ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्तीक जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक.मनिष धात्रक,होते तर प्रमुख मान्यवर पर्यवेक्षक आढावे एन.बी,जेष्ठ शिक्षक श्री.पाठक आर.डी,श्री.शालिक बोरसे होते.कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक श्री.एम.ए.पाटील यांनी केले.स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रा बद्दल व राजमाता जिजाउंच्या जिवनपटावर विशेष माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कार्यक्रमावेळी दोघ महापुरुषांच्या प्रतिमा पुजन व पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आजच्या तरुणांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाउंच्या साहित्यातुन आदर्श संस्कार मिळु शकतात.त्यांनी यांचे जिवन पटाची पुस्तक,ग्रंथ वाचणे आवश्यक आहे.भारतीय संस्कृतींचे हे दोन महान राट्र पुरुषांचा आदर्श फार महत्वाचा ठरेल असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषनातुन प्रकट केले.

या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक श्री.शिंदे आर.जी,श्री.पाटील किरण,श्री.वाय झेड पाटील,श्री.सैंदाणे ए.झेड,श्री.आर.टी.बाविस्कर,श्री.पी.जी.साळुंके,श्री.एम.ए.पाटील,श्री.पाठक आर.डी,श्रीमती पाटील एस.बी,श्रीमती.पाटील एन.एन.,श्रीमती थोरात एस.जी,श्रीमती बोरसे जे.एम यांनी विशेष परिश्रम घेतले.🌹💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध