Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ जानेवारी, २०२०
मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये- निलेश राणे
मुंबई:प्रतिनिधी:मराठ्यांनी काय करावं ते पवारांच्या कुत्र्याने सांगू नये, अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
महाराष्ट्रातील जनता बोलतेय, छत्रपतींच्या गादीच्या वारसदारांनी बोललंच पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांनी भाजपमधून राजीनामे द्यावे, असं म्हणत संजय राऊत यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं होतं. यावरूनच निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
जेव्हा जेव्हा मराठ्यांच्या भावना दुखवल्या तेव्हा तो आगीत तेल ओतायला येतोच. कोणीही गोयलचं समर्थन केलेलं नाही पण ह्याला मराठ्यांमध्ये भानगडी लावायच्या आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी राऊतांवर केली आहे.
दरम्यान, राणे कुटुंब आणि शिनसेनेमधील वाद सर्वांना माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून निलेश यांच्या टीकेला काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा