Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
वंदनीय बच्चूभाऊ सारखे सगळे मंत्री काम करतील तर महाराष्ट्र राज्याचे नक्कीच परिवर्तन घडेल .
वंदनीय बच्चूभाऊ सारखे सगळे मंत्री काम करतील तर महाराष्ट्र राज्याचे नक्कीच परिवर्तन घडेल .
फाईल विनाकारण थांबली तर त्यांची नोकरी थांबली, वंदनीय बच्चू कडूंचा अधिकाऱ्यांना इशारा.
प्रतिनिधी:‘फाईल विनाकारण थांबली तर त्यांची नोकरी थांबली. कायद्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागले.
शिक्षणाधिकाऱ्यांकडे घोषवारा मागितला आहे. सात दिवसांच्यावर फाईल थांबविली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.’ असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. कडू आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात त्यांनी जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा, शालेय शिक्षण, महिला आणि बालविकास विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, कायदेशीर कारवाईसाठी मला अडविणारा आजपर्यंत तरी कोणी तयार झालेला नाही. माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होईल मंत्रीपद जाईल पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास मी ते खपवून घेणार नाही.
असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिला. त्याचप्रमाणे अद्यापही अनेक शासकिय योजना लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पन्नास वर्षापूर्वी महिला व बालसंगोपन योजना अस्तित्त्वात आली. प्रत्यक्षात मात्र 10 ते 20 हजार विधवा महिला लाभार्थ्यांची संख्या असताना या योजनेचा लाभ फक्त तीनशे, चारशे लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचणे हे दुर्दैवी आहे.
तसेच मी जनतेचे त्रास कमी करण्यासाठी मंत्री झालो आहे. असे सांगत ते म्हणाले की, कायदेशीर कारवाईसाठी मला अडविणारा आजपर्यंत तरी कोणी तयार झालेला नाही. माझ्यावर दबाव तंत्राचा वापर करून इ कोणालाही शरण जाणारा नाही. पण, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर मी ते खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा