Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

आमच्या सामाजिक चालीरिती आणि आमचा सामाजिक भुतकाळ यांच्यासाठी सामाजिक आवाहन करु या।। श्री अर्जुन सुर्यवंशी-भोई, मुंबई






मुंबई प्रतिनिधी:अजुनही आठवतात ते पुर्वीचे दिवस, त्या सामाजिक चालीरिती, लग्नातील त्या मुक्त हास्यांची पर्वणी, ते आनंददायी क्षण, तो सामाजिक एकोपा... परंतु आज काही ठिकाणी पैशांच्या माध्यमातून काहींकडून व्यक्ति व्यक्तिची गणना होतांना दिसते आहे. 

अनेक ठिकाणी समाजघटक संघटन संघटन मध्ये तसेच अनेक राजकीय पक्षांच्या क्षेत्रात विभागला गेल्यामुळे पुर्वीचा तो सामाजिक पटलावरील आनंद काही प्रमाणात, काही वेळा कमी तर काही ठिकाणी मुकला जातांना दिसतो आहे... त्यासाठी आपण सर्व आपल्या सामाजिक पातळीवरुन आवाहन करु या की, राज्यातील शासन दरबारी भोई जमाती म्हणून अंतर्गत नोंद असलेल्या त्याच्या विविध तत्सम जमातीघटक अर्थात कहारभोई, झिंगाभोई, परदेशीभोई, राजभोई, कहारगोडीया, किरात, मछुआ, मांझी, जतिआ, केवट, ढीवर, धीवर, धीमर, पालेवार, मच्छिंद्र, नावाडीभोई, मल्हार, मल्हाव, मल्लाव,बोई, नावाडी, नावाडीतारु, खाडीभोई, गाढवभोई, खारेभोई, ढेवरा, भनारा-भनारी-भनारे, निषाद, मल्ला, मल्हारभोई, नाविकभोई, ओडेवार, ओडेलु, बेस्तार-बेस्ता यांच्या सामाजिक परंपरांना आपण सतत तेवत ठेवण्याचा प्रयत्न करु या. 

आपली माती, आपली माणसं आणि आपले हक्क अधिकार यांच्यासाठी आपआपल्या सामाजिक पातळीवरुन एका ठिकाणी एकञ येऊन एका रुपाने, एका दिलाने एकाच सामाजिक एकतेचे कार्य करु या आणि तसे होण्यासाठी आपण सर्व सामाजिक आवाहन ही करु या।।। जय समस्त भोई तत्सम जमाती राज, जय महाराष्ट्र

1 टिप्पणी:

प्रसिद्ध