Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

शिवसेना नेते कॅबिनेट मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आज शिंदखेडा तालुक्यात सभा



शिंदखेडा (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा शिवसेना नेते खान्देशची मुलुखमैदान मैदान तोफ ना गुलाबराव पाटील यांच्या आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ शिंदखेडा तालुक्यात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले 

सायंकाळी चार वाजता बेटावद येथे साडेचार वाजता नरडाणा येथे तर सायंकाळी पाच वाजता येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी व जाहीर सभा तालुक्‍यात जोरदारपणे होत असून शिंदखेडा तालुक्यात खान्देशची मुलुख मैदानी तोफ धडाडणार असल्याने नागरिकात उत्साह निर्माण झालेला आहे महा विकास आघाडीने शिंदखेडा तालुक्यात शिवसेनेला नरडाणा चिमठाणे धमाणे या गटात उमेदवार दिले असून याठिकाणी ही तोफ धडाडणार असल्याने शिवसेनेत उत्साह संचारला आहे नामदार गुलाबराव पाटील यांच्यासमवेत शिवसेनेचे धुळे नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे सहसंपर्क प्रमुख अतुल भाऊ सोनवणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे माजी जिल्हाप्रमुख राजू पाटील विधानसभा संघटक छोटू पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत

-----------------------------------------------

विखरण देवाचे येथे उद्या ना धनंजय मुंडे यांची सभा


राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची उद्या विखरण( देवाचे) येथे सभा



शिंदखेडा ( प्रतिनिधी) शिंदखेडा  तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती  निवडणुकीच्या प्रचारार्थ महा विकास आघाडीच्या माध्यमातून तीनही पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून राष्ट्रवादी पक्षातर्फे विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा विद्यमान कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी पक्षाचे मुलुख मैदानी तोफ नामदार धनंजय मुंडे यांची जाहीर सभा उद्या सकाळी विखरण देवाचे ता शिंदखेडा येथे दहा वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षातर्फे देण्यात आली आहे
महाविकास आघाडीतर्फे या विखरण गटात माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या धर्मपत्नी इंदिरा रामकृष्ण पाटील या निवडणूक लढवत असून महा विकास आघाडी सह राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे दरम्यान या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ नामदार धनंजय मुंडे हे जिल्ह्यात आले असून जिल्हाभरात त्यांच्या नऊ ठिकाणी सभा आज व उद्या आयोजित करण्यात आल्या आहेत दरम्यान विखरण तालुका शिंदखेडा येथे नामदार धनंजय मुंडे यांच्या समवेत माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध