Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूरात श्री गायत्री परिवार व विवेकानंद केंद्राद्वारे राष्ट्रीय युवा दिवस व राजमाता जिजाऊ जयंती समारोह साजरा
शिरपूरात श्री गायत्री परिवार व विवेकानंद केंद्राद्वारे राष्ट्रीय युवा दिवस व राजमाता जिजाऊ जयंती समारोह साजरा
शिरपूर:प्रतिनिधी:येथील श्री गायत्री परिवार ट्रस्ट, स्वामी विवेकानंद केंद्र व अ. भा. विद्यार्थी परिषदेमार्फत श्री गायत्री मंदीरात आज सायं. ४:०० वाजता राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती समारोह साजरा केला.
युवा दिनिनिमित्त जयपालसिंह गिरासे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी स्वामी विवेकानंदांचे कार्य व राजमातांचे जीवन व राजे शिवाजी कसे घडले याबद्दल व्याख्यान दिले. प्रतिमापूजन व मशाल प्रज्वलन शिवाजीराव पाटील गुरुजी, कमलकिशोर भंडारी, हेमराज राजपूत, प्रल्हाद सोनार, एस. डी. माळी रावसाहेब यांनी केले.
यावेळी निलिमाताई ठाकूर, रेखाताई तिवारी यांनी ईशस्तवन, प्रार्थना घेतली. विवेकानंद केंद्र शिरपूर मार्फत होणार्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली गेली. गायत्री परिवाराचे अरुण पटेल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
समारंभाचे सूत्र संचालन प्रल्हाद सोनार यांनी तर आभार प्रदर्शन आर. बी. महाजन यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा