Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ जानेवारी, २०२०
विधानभवनात लोकनेता मंत्री बच्चू कडू यांचा जनता दरबार
BY ऑनलाईन तरुण गर्जना
जानेवारी २३, २०२०
पंकज पाटील (उपसंपादक)
रात्री बारा वाजेपर्यत विधानभवन चालायचे प्रसंग फार कमी परंतु ही किमया घडत आहे. गेले २ दिवसापासुन रोज दिवसभर मिटींग व सायंकाळी कमीत कमी पाचशे ते सहाशे लोक महाराष्ट्रातुन आपल्या समस्या घेऊन विधानभवनात
येत आहेत. कार्यालय कमी पडत असल्याने त्यांचा जनता दरबार भरतो तो कधी विधानभवनाच्या छतावर तर कधी समिती कक्षामध्ये राज्यमंत्री ना. बच्चु कडु या अवलियांनी
विधानभवनाला जाग ठेवायचे काम सुरू केले आहे.
काही विघ्नसंतोषी लोकांनी भाऊंना मंत्रालयात कार्यालय दिले नाही.बंगला देखील मलबार हिल वर दिला . भाऊ कडे दिव्यांग बांधव येतात याचा
देखील त्यांनी विचार केला नाही. आपल्या या चाहत्यांसाठी बच्चु भाऊ
रात्री १२ पर्यत विधानभवनातच तळ ठोकुन बसतात.
प्रत्येकाच्या समस्या जागेवर सोडवल्या जातात हे सर्व कुणाला बघायचे
असेल तर बच्चु भाऊचा हा दरबार बघावा. रडत येणारे हजारो चेहरे रोज हसत जातात इतक्या दूर येवून
त्यांचे अश्रू पुसण्याचे काम या लोकनेत्या मार्फत होत असून सर्व साधारण जनता
त्यांच्या या कामाने त्यांना लाख आशीर्वाद देत आहे. दिवसभर मंत्रीपदाच्या जवाबदारी पार पाडुन सायंकाळी
६ ते १० विधानभवनात लोकांच्या समस्या बच्चू भाऊ सोडवत आहेत. जेवण, चहा पाणी विसरुन भाऊ लोकांच्या समस्या निरंतर सोडवताना विधानभवनात
दिसत आहेत.
विधानभवनातील कॅन्टिग मालकाची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया प्रसार
माध्यमाना मिळाली असून ते म्हटले की,
"येवढ्या वर्षापासून मि ईथे आहे परंतु पहिल्यांदाच अधिवेशन सुरु नसतांना तीन वाजताच
स्वयंपाक घरातील नाश्ता संपत आहे .ही किमया फक्त मंत्री बच्चू कडू यांच्यामुळेच
घडत असून सर्वसाधारण व गरीब जनतेचे खऱ्या अर्थाने समाधान भाऊ करत आहेत.त्यामुळे
त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा