- अमळनेर तालुक्यातील तहसीलदारांचा पारदर्शक कारभार परवाना नुतनीकरण नसतांना स्वस्त धान्य माल वाटपाचे चलन केले वितरीत
- रेशन दुकानदार व तहसीलदारांची मिलीभगत .
Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
अमळनेर तालुक्यातील रेशन दुकानाचा परवाना नूतनीकरण नसतांना देखील तब्बल चार वर्ष रेशन धान्य दुकानदाराला स्वस्त धान्य माल वितरीत करण्याचे अधिकार
अमळनेर तालुक्यातील रेशन दुकानाचा परवाना नूतनीकरण नसतांना देखील तब्बल चार वर्ष रेशन धान्य दुकानदाराला स्वस्त धान्य माल वितरीत करण्याचे अधिकार
BY ऑनलाईन तरुण गर्जना
जानेवारी २३, २०२०
पंकज पाटील (उपसंपादक)
अमळनेर तालुक्यात रेशन दुकांदारांचे दुकानाचे
परवाने नुतनीकरण नसतांना देखील तब्बल चार वर्ष रेशन दुकानदाराला स्वस्त धान्य माल वाटप
करण्याचा प्रताप अमळनेर पुरवठा विभागाकडून करण्यात आला. रेशन दुकानाचा
परवाना नुतनीकरण नसल्यास त्या रेशन दुकानांचे ,संस्थेचे प्राधिकार
पत्र शासन नियमानुसार त्वरित व तात्काळ रद्द करण्यात येते . ते स्वस्त धान्य दुकान
इतर नजीकच्या दुकानाला जोडण्यात येते असा शासन निर्णय असतांना त्याची अमलबजावणी
अमळनेर पुरवठा विभागाकडून का करण्यात आली नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
स्वस्त धान्य दुकानाचे प्रधिकार पत्र नुतनीकरण नसतांना रेशन धान्य चलन भरण्याचे आदेश
दिलेत कुणी ? त्या रेशन दुकानदाराला ,संस्थेला पाठबळ कुणाचे ? अमळनेर पुरवठा प्रशासनाचा हा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला
आहे .रेशन प्रणालीत चालेला हा काळा बाजार म्हणजे ..सब गोलमाल है ..लेकीन यह पब्लिक सब जानती है ! या सर्व गैरकारभाराची संपूर्ण शहानिशा तरुण गर्जना टीमने केली असून
लवकरच त्या संपूर्ण साखळीत असलेल्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा पारदर्शक
कारभार जनतेसमोर व तालुक्यातील आमदार यांच्या समोर तरुण गर्जना टीम आणणार आहे. या साखळीत असलेल्या दोषी अधिकारी कर्मचारी व रेशन दुकानदार यांच्यावर शासन नियमानुसार कारवाईची मागणी करण्यात
येणार असून विद्यमान आमदार या गैरकारभाराबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचे
वृत्त तरुण गर्जना टीमच्या हाती आले आहे.
अमळनेर तालुक्यात कार्डवर युनिट रजिस्टर नुसार ऑनलाईन अंत्योदय व प्राधान्य कुटुंब
लाभार्थींचे नावे यादीत समाविष्ट न करता सरास लाभार्थी निवडीचा काळा बाजार आर्थिक साटेलोटे करून करण्यात येत आहे . याला
पाठबळ कुणाचे ? रेशन दुकानदार व अधिकारी
कर्मचारी यांच्या संगनमताने हा सर्व काळा बाजार चालू
आहे का ? सर्वसाधारण गरीब जनतेच्या हक्काचे रेशन खाणारे खरे चोर कोण ? याचा तपास तरुण गर्जना टीम करत असून लवकरच सत्य
जनतेसमोर येईल .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा