Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे युवा अवस्थेला वडण देण्याचे शिबिर दिलशाद खान सर यांचे
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे युवा अवस्थेला वडण देण्याचे शिबिर दिलशाद खान सर यांचे
रावेर प्रतिनिधी:निंभोरा बु ,ता.रावेर येथून जवळच धामोडी येथे ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी शिबिर दत्तक ग्राम धामोडी ता. रावेर येथील जि.प.मराठी शाळेत सुरू असून रासेयो एककाचे विशेष हिवाळी शिबिरात दिलशाद खान सर यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात तरुण वयाला योग्य वळन देनारे शिबिर आहे त्याचा पुरेपुर फायदा घ्या. भाग्यवंत विद्यार्थी च या शिबिरात सहभागी होतात असे सांगून त्यांनि त्यांच्या शेर शायरीने सर्व विद्यार्थ्यांना मोहून टाकले.
तर प्राध्यापक दिलीप सोनवणे यांनिही शेर शायरी, कविता व अनुभव कथन करत अशक्य या जगात काहिच नाही प्रयत्न करा यश नक्की मिळेल येथे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त कला गुणांन असतात त्यांना वावदेणारे हे हक्काचे व्यासपीठ आहे असे सांगून विद्यार्थ्यांन मध्ये आत्मविश्वास जागृत केला.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रम अधिकारी डाॅ जयंत नेहेते सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ .डी.बी. पाटील ,प्रा.रूपाली बऱ्हाटे, प्रा. मनिषा महाजन, हे उपस्थित होते. कुमारी आरती पाटील हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तर आभार कुमारी पूनम पाटील हिने मानले. नितिन महाजन, सचिन महाजन यांनी मेहनत घेतली . . तसेच कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व प्राध्यापक वृंद आणि रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले .
फोटोत:-ऐनपूर महाविद्यालयाच्या धामोडी येथिल एन.एस.एस कँम्प मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन हितगुज करतांना दिलशाद खान सर, प्रा.दिलीप सोनवणे यावेळी व्यासपिठावर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.पी.नेहेते, प्रा.डॉ.डी.बी.पाटील...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा