Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ जानेवारी, २०२०
सिंचन घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे :राजू शेट्टी
कोल्हापूर प्रतिनिधी:सिंचन घोटाळ्यात नेमकं काय झालं? याचं सत्य बाहेर आलंच पाहिजे. त्याला कोण जबाबदार आहे, कोण नाही याबद्दल आम्हाला काही देणंघेणं नाही. परंतु, एवढ्या मोठ्याप्रमाणावर सिंचनावर पैसा खर्च होऊन देखील, जर सिंचन वाढलेलं नसेल, तर नेमकं पाणी कुठतरी मुरतं आहे.
पैसा कुठंतरी मुरलेलाच आहे आणि म्हणूनच हे सत्य जनतेला कळालं पाहिजे, हा जनतेचा अधिकार आहे. कारण, शेवटी तो करदात्यांचा पैसा आहे. असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर सांगितले आहे.
आज शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर ज्या आत्महत्या होत आहेत, त्याला सिंचनाचा अभाव हे देखील एक कारण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न असल्याने, हा प्रश्न केवळ राजकीय असता कामा नये.या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन जे सत्य आहे, जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर आलाच पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
कर्जमाफीचे निकष बदलण्याची गरज
सध्या जी काही दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे व त्याला जे काही निकष लावण्यात आले आहेत. या निकषामध्ये सहा ते सात हजार कोटींच्यावर रक्कम जात नाही. एकतर आकडा चुकीचा आहे किंवा मग तुमच्याकडे ३१ हजार कोटी खर्च करण्याची तयारी असेल, तर हे निकष बदलावे लागतील, असं देखील राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा