Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ जानेवारी, २०२०

संवादामुळे माणुसकी जन्माला येत पण मोबाईल मुळे संवाद विसरत चाललोय- प्रा डॉ सी एस करंके



शिंदखेडा:प्रतिनिधी:महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात प्रा. डॉ. सी एस करंके  यांनी तरुणांना  मार्गदर्शन करताना जी नाण्यासारखी वाजतात ती तरुण पिढी असते म्हाताऱ्यांचे शिबीर कधी होत नाही संवादामुळे माणुसकी जन्माला येते पण मोबाईल मुळे संवाद विसरत चाललोय . सर्कस मधला नायक जसा वेळेचे भान पाहतो तसा आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण शिकले पाहिजे.

नवनिर्मितीचा आनंद घ्या, व्हाट्सअप म्हणजे एकाच्या अंगणातला कचरा दुसऱ्याच्या अंगणात टाकणे .तरुण पिढीचा वर्तमान काळ संपत चाललेला आहे. मोबाईल मुळे आपली प्रगती होण्यापेक्षा अधोगती होत आहे, मोबाईलमुळे तरुणांची खोटे बोलण्याची वृत्ती वाढत आहे तरुणांचा वर्तमान काळ हा दिशाहीन होत आहे असे सांगितले   
     
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन विद्यार्थी भटू बच्छाव सुत्रसंचलन कु. तृष्णा गिरासे व आभार कु.अश्विनी बोरसे यांनी मानले.
या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा.जे.व्ही.पावरा, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.आशा कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.आर.पाटील, श्री पंकज साळुंखे,विशाल पाटील सहकार्य करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध