Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ जानेवारी, २०२०
नीट वागा, नाहीतर ठाकरे राजीनामा देतीलः गडाख
अहमदनगर:प्रतिनिधी: राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नीट वागले नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केव्हाही राजीनामा देतील, मुळात उद्धव ठाकरे हे काही राजकारणी नाहीत, ते कलाकार आणि शब्द पाळणारा माणूस आहे.
म्हणून मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य द्यायचे असेल, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भांडणे कमी करावीत. उद्धव ठाकरे यांचे आभार मानावेत, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी खासदार
यशवंतराव गडाख यांनी दिला.
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा नेवासा तालुक्याच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
गडाख म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांचे आभार मानावेत. उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला नसता, तर हे दोन्ही पक्ष विरोधी बाकांवर दिसले असते. आता ग्रामीण भागातील सरकार सत्तेत आले आहे. शहरातील सरकार गेले आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्यासाठी बंगले कशाला पाहिजेत, अशी विचारणा करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या मंत्रिमंडळातील रोज एक मंत्री रुसतो आहे.
बंगला नीट मिळाला नाही, खाते नीट मिळाले नाही, यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू असतात. हे कुठेतरी थांबायला हवे, अशी अपेक्षाही गडाख यांनी यावेळी व्यक्त केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा