Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा; राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
पुणे:प्रतिनिधी:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं निमित्त साधून मनसेनं आयोजित केलेल्या महाअधिवेशनात नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचं प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. राजकीय पक्षानं तिचा वापर करणं चुकीचं आहे.
त्यामुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तसं निवेदन पोलीस ठाण्यात दिलं आहे.
मुंबईत मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचं अनावरण केलं. हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे.
त्याच्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिण्यात आलं आहे. मात्र, मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्याला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे.
त्यांनी मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेविरोधात तक्रार केली आहे.
'राज'पुत्र सक्रिय राजकारणात; अमित ठाकरे मनसेच्या नेतेपदी
मनसेच्या नव्या झेंड्यांचा अर्थ काय?; चर्चा सुरू छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही प्रशासकीय मुद्रा असून, त्यानुसारच शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण केलं.
शिवरायांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचं प्रतिनिधीत्व करणारी राजमुद्रा ही रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. तिचा वापर कोणत्याही राजकीय पक्षानं करणं चुकीचं आहे, असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे. प्रांत, भाषा, जात आणि धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या मनसे आणि राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मनसेच्या या कृतीमुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडनं केली आहे. राजमुद्रेचा गैरवापर केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाइलनं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा