Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ जानेवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
भाजपा कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमीत्त आ काशिराम पावरा यांचा हस्ते ध्वजारोहण संपन्न
भाजपा कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमीत्त आ काशिराम पावरा यांचा हस्ते ध्वजारोहण संपन्न
शिरपूर: देशभक्तीची भावना ही क्षणीक न ठेवता वर्षभर ही भावना मनात कायम ठेवत भारताच्या विकासाचा विचार पुढे नेण्याची आज नितांत आवश्यकता आहे.
लालबहादुर शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, अटलजींनी त्याला जय विज्ञान अशी जोड दिली. आज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जय अनुसंधान अशी जोड त्याला दिली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे संविधान फक्त अधिकारच शिकवत नाही तर कर्तव्य परायणता सुध्दा शिकविते.
शिरपुर येथील भाजपा कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमीत्त प्रथमच ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य मला लाभले असल्याचे प्रतिपादन आ. काशिराम पावरा यांनी केले.
दिनांक 26 जानेवारी रोजी येथील भाजपा कार्यालय प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमीत्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर पक्ष कार्यालयात आ. काशिराम पावरा बोलत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रथम भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांचा हस्ते भारत माता प्रतिमा पुजन करण्यात आले.
आ. काशिराम पावरा हे पक्ष कार्यालयात प्रथमच आल्याबद्दल जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचा हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मर्चंट बॅन्क चेअरमन प्रसन्न जैन, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, नितीन राजपुत, बापु थोरात, शाम ईशी, डाॅ. मनोज निकम, किशोर माळी शिरपुर, महेंद्र पाटील, मुकेश पाटील, राधेश्याम भोई, मुबीन शेख, युसुफ बेग, श्रीकृष्ण शर्मा, देवेंद्र देशमुख, सुनिल माळी, भुरा राजपुत, सुनिल जैन, विक्की चौधरी, रविंद्र सोनार, रविंद्र भोई, अनिल पाटील, रमेश चौधरी, गोपाल मारवाडी, नरेंद्र पाटील, भालचंद्र चौधरी, दिनेश पाटील, रहिम खाटीक, हिरा कोळी, मुन्ना राजपुत, भालेराव माळी, पंढरीनाथ अहिरे, जयवंत पाटील, जगन पाटील, अरमान मिस्तरी, रफीक तेली, जाकीर तेली आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. काशिराम पावरा यांनी गणराज्य दिन चिरायु होवो अशी भावना व्यक्त करत उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा