Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०
आजपासून तीन दिवस बँका बंद, कर्मचारी पगारवाढीसाठी संपावर
धुळे:प्रतिनिधी:देशातील सर्व सरकारी बँका आज आणि उद्या संपावर गेल्या असुन. वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागणीवर कोणतीही सहमती झाली नाही. त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे आज आणि उद्या सरकारी बँका बंद राहणार आहेत. याशिवाय संपाला जोडून रविवारची सुटी असल्यानं सलग तीन दिवस बँकांचे व्यवहार कोलमडण्याची चिन्हे आहेत.
तसेच. उद्या,चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते तर रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
वेतनवाढ, पाच दिवसांचा आठवडा यांसह विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोनदिवसीय बंद पुकारला आहे. शहरातील जवळपास सर्व सरकारी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी झाले असुन. तीन दिवस बँक बंद राहिल्यास धुळे शहरात जवळपास हजारो कोटींचे व्यवहार ठप्प पडणार आहेत.
दरम्यान, वेतनवाढीच्या मागणीबाबत भारतीय बँक महासंघ अर्थात आयबीए या बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाशी वाटाघाटी असफल झाल्याने बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुकारला आहे. संपाच्या काळात ग्राहकांना केवळ ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध असेल. या अनुषंगाने शहरातील एसबीआय बँके जवळ कर्मचारी व अधिकारी यांनी आंदोलन करण्यात आले.
यावेळी संजय सिंग गिरासे, राजेंद्र चव्हाण, नरेंद्र वडनेरे, हेमंत कुलकर्णी, लक्ष्मीकांत जोशी, आनंदा सोनवणे, शिवाजी भामरे, दिपक राव, सचिन येवले, मोहन महाले, प्रमोद वेल्हाणकर, दिवाकर बडगुजर, राजेंद्र चव्हाण, आदि उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा