Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ जानेवारी, २०२०
दुर्दैवी घटना: जळगावात जन्मदात्या पित्याकडून ७ वर्षाच्या मुलीची हत्या !
जळगाव:प्रतिनिधी: येथील तालुका पोलीस स्टेशनच्या मागे निमखेडी शिवारात वास्तव्यास असलेल्या संदीप चौधरी याने आपल्या सात वर्षीय मुलीची हत्या करून बांभूरी पुलावरून फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.
आज गुरुवारी सकाळी ही घटना समोर आली. कोमल संदीप चौधरी असे मयत मुलीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी मुलीच्या वडिलाला पारोळा येथून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.
बापानेच मुलीची हत्या करून पत्नीला फोन करत मुलीची हत्या केल्याची माहिती दिली. स्वत: आत्महत्या करणार असल्याचेही संदीपने पत्नीला सांगितले. मात्र त्याला पोलिसांनी पारोळा येथून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलाभ रोहम, भाग्यश्री नवटक्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निर्क्षक बापू रोहम यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली.
काल बुधवार रात्रीपासून कोमल आणि तिचे वडील संदीप हे बेपत्ता होते. त्यानंतर कोमलच्या मामा आणि काकाकडून दोघांचा शोध सुरु झाला. मात्र रात्रभर ते सापडले नाही. दरम्यान आज गुरुवारी सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती कोमलच्या मामाला आणि काकाला दिली. मुलीला मामाने ओळखले आहे. पुढील चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा