Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी रोजी राजे भोईराज बहुउद्देशीय संस्था पिंपरी गवळी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा र. जी. F18338/बुलढाणा /2019 यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.





मोताळा:प्रतिनिधी:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी रोजी राजे भोईराज बहुउद्देशीय संस्था पिंपरी गवळी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा र. जी. F18338/बुलढाणा /2019 यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान करण्यापूर्वी सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संस्था अध्यक्ष श्री सुनील कुमार सुखदेव भामद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. 

तसेच गावातील माजी पंचायत समिती सदस्य यादवराव मोहळे, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, गावातील तरुण, संस्था सचिव सौ वैशाली भामंद्रे या सर्वंनी महाराराजाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रा. आ केंद्र पिंप्रीगवळी येथे भरती असलेल्या रुग्नांना चहा  भिस्कीट व नास्ता वाटप करण्यात आला. 

नंतर रक्तदानाला सुरवात करण्यात आली. त्यावेळी प्रथम माजी पं. स. सदस्य ईशवरसिंग पवार, माजी सैनिक आनंद कापसे, संस्था अध्यक्ष सुनिलकुमार भामंद्रे यांनी रक्तदान केले आणि पाठोपाठ गावातील रक्तरदाते सुधीर कुलकर्णी, वैभव पाटील, विठ्ठल क्षरीसागर, ग्रामपंचायत सदस्य नितीन खराटे, उमेश गोरे, गोपाल पवार, अनंता किनगे,स्वप्नील इंगळे, रोशन पाटील, भूषण फुकटे, गौरव उबाळे, राहुल सोनुने, हेमंत सोनुने, अलोक क्षरीसागर, प्रसाद इंगळे, हर्षल खर्चे, स्वप्नील मालुकार, दुर्गेश तळेकर, विनोद सुरळकर, गजानन चव्हाण, मनोज उबाळे, संजय क्षरीसागर, शुभम हुडेकर, योगेश टोंगळे, नितीन पाटील, शुभम खर्चे, सागर पाटील, गोपाल सोनुने, अक्षय हुडेकर, रमेशसिंग राजपूत, गोपाल कापसे, सचिन इंगळे, डॉ. रामेश्वर भाकरे, मंगेश चव्हाण, संदीप क्षरीसागर, नवल इंगळे, सचिन बुडुकले, वैभव इंगळे, कैलास सुरळकर, भूषण फुकटे, आकाश सोनुने, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, भागवत देशमुख, देविदास सुरळकर, शांताराम घोडेस्वार, राजेंद्र पवार, अशा एकूण 50 शिवभक्तनी रक्तदान केले.

त्यावेळी बुलढाणा येथील शासकीय रक्तसंक्रमण पेढी येथील कर्मचारी डॉ. विशाल लहाने रक्त संक्रमण अधिकारी, विनोद झगरे टेक्निकल सुपरवायझर, कु. सोनल राजपूत रक्तपेढी तंत्रज्ञ, विशाल झाबडे, डॉ. हर्षवर्धन अंतरनिवासी, सुगदेव झारे कक्ष सेवक, व संस्थेचे सर्व विस्वस्त सचिव सौ वैशाली भामंद्रे, विनोद भोई बोदवड, तसेच पिंप्रीगवळी गावातील प्रा. आ. केंद्र येथील डॉ. पंकज पाटील, गोपाल ढोके, गजानन तायडे, निलेश भाऊ, रघुनाथ मोहळे, आणि सर्व कर्मचारी तसेच विशेष सहकार्य करणारे स्वप्नील भामंद्रे, दीपक भामंद्रे, आत्माराम कुसुमबे, गजानन मोहाळे, शुभम नारखेडे, संदीप चैधरी, श्रीकृष्ण सुरळकर, विलास कातोरे, समाधान सुरळकर, सिद्धिविनायक पाटील, यांचेसह इतर लोकांच्या उपस्थिती त अगदी आनंदी वातावरनात रक्तदान शिबीर संपन्न झाले. व संध्याकाळी गावातील शेकडो युवकांनी भगवे ध्वज लावून बाईक रॅली काढून शिस्तीत व थाटामाटात शिवजयंती साजरी केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध