Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

थोरगव्हान येथे भैरवनाथ यज्ञ संपंन्न. पाच ते सहा हजार भाविकांनी लावली हजेरी. रावेर आगारातून दोन बसेस येण्याजाण्यास उपलब्ध.




प्रतिनिधी:रावेर: रावेर तालुक्यातील
थोरगव्हान येथिल जागृत देवस्थान काळभैरव मंदिरावर अमावसेला २२ रोजी रात्री ९ ते १० या वेळेत स्वामी समर्थ भक्तांन मार्फत मोठा यज्ञ संपंन्न झाला या यज्ञास जवळ जवळ पाच ते सहा हजार भाविक भक्तांनी या सामुहीक यज्ञात सहभाग घेतला. 


या यज्ञाची फलश्रुती भाविक भक्त स्वतःत्यांच्या तोंडून वर्णन करतात. मोठ्या श्रध्देने महीण्याच्या दर अमावसेला ही सेवा स्वामी समर्थ भक्तांन कडून होत असते. या सेवेत रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील स्वामी भक्तांनसह मुंबई, गुजरात, पुण्याहुण ही स्वामी भक्त मोठ्या संखेने येतात. या सेवेला रावेर आगाराकळून दोन बसेस ची व्यावस्था करण्यात आली होती त्या मुळे मोठ्या संख्येने भावीक येजा करूशकले. 

पुढिल सेवा २३ मार्च सोमवती अमावसेला होणार असल्याचे अरविंद कोलते आप्पा यांनी सांगितले या कार्यक्रमात गावातील स्वामी भक्तांसह काळभैरव युवक भक्त ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम यशस्वीतेसाठी मदत करतात.

सावदा पासून ३ कीमी वर थोरगव्हान येथिल देवस्थान पुरानात उलेख असलेले जागृत देवस्तान आहे. येथे सात वर्षापासून ही आमवस्याची सेवा सुरू असून रात्री ९ वाजता सेवेला सुरुवात होवून फक्त एकतासाची सेवा असून दर आमावसेला जवळपास पाच हजार महिला पुरुष भक्त गण एकत्र येवून श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आर्शीवादाने ही सेवा करून श्री काल भैरवनाथ महाराजांची सेवा करत आहे व आशीर्वाद प्राप्त होत आहे. ही सेवा सात वर्षा पासून प्रत्येक आमावस्याला होत आहे. विशेष म्हणजे हवनयूक्त असून या सेवेसाठी थोरगव्हान गावातील श्री कालभैरव संस्थान पदाधिकारी, ग्रामस्थ, स्वामी समर्थ सेवेकरी ,चेतन पाटील, योगेश झोपे, हर्षल पाटील,उमाकांत बाऊस्कर, नाना महाजन  
रावेर येथील अरविंद कोलते अप्पा ,फैजपूर जितेंद्र वर्मा, चिनवाल बाळू सर, खिर्डी बाळासाहेब निमगुडे साहेब, विवरे गणेश महाजन सर, निभोरा किशोर चौधरी, प्रा.दिलीप सोनवणे, रोझोदा विजय होले हे व परिसरातील भाविक सेवा साठी खूप परिश्रम घेतात.

फोटोत यज्ञात आहूती देतांना सेवेकरी भाविक व उपस्थित भाविक भक्तगण.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध