Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
जवाहर फौंडेशनच्या एसीपीएम रुग्णालयात 2 मिनिटात होणार बायोकेमिस्ट्री टेस्ट
धुळे:प्रतिनिधी:जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या ए.सी.पी.एम.मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात नुकतेच फुल्ली ऑटोमॅटिक बायोकेमिस्ट्री अनालायझर मशीन बसविण्यात आले. पूर्वी कोणत्याही बायोकेमिस्ट्री टेस्टसाठी दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागत होता. परंतु आता या चाचण्या केवळ दोन ते चार मिनिटात करणे शक्य होणार आहे. या नवीन माशीनमुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पेशंटची बायोकेमेस्ट्री टेस्ट करणे सुलभ होणार आहे. बायोकेमिस्ट्री टेस्टमध्ये बिलीरुबिन, शुगर, युरिया आदी 29 ते 30 प्रकारच्या विविध टेस्ट एकाच वेळी या मशीनमध्ये करणे शक्य होणार आहे. फुल्ली ऑटोमॅटिक बायोकेमिस्ट्री अनालायझर मशीनसोबतच रुग्णालयात थ्री पार्ट अनालायझर मशीन बसविण्यात आले. रक्तातील हिमोग्लोबिन, एमसीआयटी, एमसीबी, अनिमिया यांच्यासह रक्तातील कोणताही दोष या माशीनमुळे अवघ्या दोन मिनिटात शोधणे शक्य होणार आहे.
रुग्णालयातील अत्याधुनिक लॅबमध्ये या दोन्ही मशीनचे उद्घाटन जवाहर मेडिकल फाउंडेशनचे चेअरमन भाईदास पाटील, पुष्पाताई पाटील, ममताताई पाटील, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विजय पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मशीनच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. आरती कर्णिक, डॉ. राहुल घोणे, डॉ. नंदकुमार द्रविड, डॉ. आर. व्ही.पाटील, डॉ. अरुंधती गद्रे, डॉ. राहुल वाडिले, डॉ. ए. डब्ल्यू.पाटील, डॉ. इलान, डॉ. राहुल शिंदे, तंत्रज्ञ शरद पाटील, पीआरओ (प्रशासन) राकेश काकुस्ते, विवेक रवंदळे, निंबा मराठे आदी उपस्थित होते. या सेवेचा रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही दानापेक्षा अवयवदान हे पवित्र दान आहे. त्यासंदर्भातील कथित गैरसमज दूर करून प्रत्येकाने अवयवदानासाठी पुढाकार घ्यायला हवा. आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा तर अधिक आनंदाचे असे काय असेल ?
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे प...
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा