Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

रस्ता सुरक्षा अभियान २०२० अंतर्गत शहर वाहतूक शाखा कार्यालय धुळे यांच्या माध्यमातुन रस्ता सुरक्षा पथक (आर.एस.पी.) ची स्थापना करण्यात आलेली असुन. सदर रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत धुळे शहरातील माध्यमिक शालेय विदयार्थी व विदयार्थीना यांना वाहतुक निमनाबाबत प्रबोधन केले जाते.



धुळे:प्रतिनिधी:आज दिनांक २७/०२/२०२० रोजी आवेदा अब्दुल मुगी उर्दु गर्ल हायस्कुल, व नॅशनल ऊर्दू हायस्कूल, अॅण्ड जुनिअर कॉलेज,आझाद नगर धुळे येथील मैदानावर ७वी, ८वी, व ९ वी, च्या विदयार्थी व विदयार्थीनी यांची सकाळी ०८.०० ते ०९.०० वाजे पर्यंत चित्र रंग भरण स्पर्धा घेण्यात आली. होती सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर.एम.उपासे. पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा धुळे हे होते. व प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.महेश नेरकर अध्यक्ष रस्ता सुरक्षा फॉडेशन धुळे हे होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष श्री. उपासे यांनी विदयार्थी व विदयार्थीनी यांना वाहतुक नियमनाबाबत प्रबोधन केले. 
तसेच सदरची चित्ररंग भरण स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धतीत प्रथम, द्वीतीय, व तृतीय क्रमांचे बक्षिस प्राप्त विदयार्थी यांना सायकल व स्कुल बॅक, रंग साहित्य पेटी वाटप करण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमात ६५० ते ७०० विदयार्थी व विदयाथीनी यांनी सहभाग घेतला होता...

सदर स्पर्धेचा निकाल चित्रकला महाविद्यालय स्टेशन रोड धुळे येथील चित्रकला शिक्षक मराठे व गव्हाणे सर यांनी जाहिर केला सदर चित्रकला स्पर्धा घेण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे सपोनि. संगिता राऊत, पोहेको. ज्ञानेश्वर पाटील, पटना. दिनेश देवरे, रमेश वाघ, किरण मेहरुणकर, राहुल पाटील, मनोहर महाले, प्रविण नागरे, व माहिला पोलीस मोनाली सैदाणे यांनी परिक्षम घेतले. तसेच आबेदा अबदुल मुगी ऊर्दु गर्ल हायस्कुल धुळे येथील मुख्यध्यापिका व शिक्षक वर्ग यांनी सदर श्री. मराठे व श्री. गव्हाणे सर यांनी जाहिर केला. सदर चित्रकला कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध