Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
मराठीच्या संवर्धनासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा : ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के
मराठीच्या संवर्धनासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा : ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के
धुळे:प्रतिनिधी:मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीबरोबरच सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असून यासाठी सर्वांनी पुढाकार घेवून प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय म्हस्के यांनी आज केले.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यीक, कवी वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय कार्यालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री.म्हस्के बोलत होते.
यावेळी जिल्हा ग्रंथालयाचे तांत्रीक सहाय्यक चंद्रकांत ठाकूर, विश्वास पाटील, कुणाल देवरे, पी.एम.सुर्यवंशी, जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर पाटील, अशोक पाटील यांच्यासह ग्रंथालयातील वाचक व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लोकसाहित्य- उत्सव मराठीचा’ ही यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. मातृभाषेची महती आणि माहिती तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टिने महत्व याविषयावर या दिनानिमित्त जनजागृती करण्यात येणार येत आहे. एकेकाळी महाजालाच्या अर्थात इंटरनेटच्या जाळ्यात मराठी हरवून बसेल असे वाटत असतांना मराठी भाषा महाजालावरही मात करून आपले स्थान बळकट करीत आहे. महाजालावर मराठी अधिकाधिक पोहोचवण्यात मराठी तरुणाईने घेतलेला पुढाकार निश्चितच उत्साह वाढवणारा ठरेल, असा विश्वासही श्री.म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सर्वप्रथम सरस्वती पुजनासह कवी कुसूमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तर माहिती व जनसंपर्क विभागाने भाषा दिनाच्या औचित्य साधून प्रकाशित केलेल्या मराठी लोकराज्याचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात सोय उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थी, वाचक व अभ्यासकांनी मोठ्या संख्येने वार्षिक वर्गणीदार होण्याचे आवाहन या प्रसंगी उपस्थितांना करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण वंजारी, श्रीमती अर्चना साळुंखे, सुलभा कुवर, नुतन पाटील यांनी परिश्रम घेतले.
एसएसव्हीपीएस महाविद्यालयात काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत एसएसव्हीपीएस महाविद्यालयात काव्यवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
एस.एस.व्ही.पी.एस.महाविद्यालय, खान्देश साहित्य संघ व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यवाचानाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य मनोहर पाटील यांनी प्रतिमापुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.मोहन पावरा यांच्यासह डॉ.आर.डी.वाघ, प्रा.सदाशिव सुर्यवंशी, प्रा.दिपक चौधरी, प्रा.शशिकांत बोरसे, डॉ.रविंद्र वाघ, जिल्हा माहिती कार्यालयाचे अतुल सोनवणे आदि उपस्थित होते.
काव्यवाचनाचे मराठी साहित्यात मोठे योगदान असल्याचे सांगत प्राचार्य मनोहर पाटील म्हणाले, वाचाल तर वाचाल या ओवीचे अनुकरण नवीन पिढीने अंगिकारावे, वाचनाने ज्ञानात भर पडून सुदृढ समाजनिर्मीस प्रोत्साहन मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ.पावरा म्हणाले, लिखाणासह वाचनाचा छंद मी जोपासला आहे याचे अनुकरण करतांनाच आपल्यातला कवी जागृत ठेवून काव्यात्मक लिखाणावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले. सातपुडा परिसरात जन्म घेतलेल्या डॉ.पावरा यांनी महुच्या फुलांवर अप्रतिम कवितेचे सादरिकरण केले. तर उपस्थित विद्यार्थ्यांनीदेखील कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देवून प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा.निलेश पाटील यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा