Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान च्या वतीने नागेश्वर अजनाड बंगला येथे प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 24 फेब्रुवारी ते दि. 27 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले असून या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीक्षेत्र नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.
श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान च्या वतीने नागेश्वर अजनाड बंगला येथे प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 24 फेब्रुवारी ते दि. 27 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले असून या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीक्षेत्र नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.
शिरपूर:प्रतिनिधी:श्रीक्षेत्र नागेश्वर येथे भूपेशभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मोठ्या प्रमाणात केले असून या ठिकाणी नव्याने श्री गणपती मंदिर, पार्वतीमाता, श्री शंभू महादेवाचे मंदिर, श्री गुरुदत्त, श्री ऋषि महाराज, श्री हनुमंत, मोती माता मंदिर निर्माण केले जात असून या सर्व मूर्तींना धान्य अधिवास करण्याचे काम होऊन दि. 24 ते दि. 27 फेब्रुवारी 2020 हे चार दिवस भव्य धार्मिक सोहळा संपन्न होत आहे.
या विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी परमपूज्य राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य बापूजी, परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्य जी महाराज, परमपूज्य सखाराम महाराज अमळनेरकर तसेच परमपूज्य आशा दिदी वणी दोंडाईचा, परमपूज्य ह.भ.प. महेश महाराज भागवताचार्य बभळाज, परमपूज्य डॉ. किमयाताई आमले राष्ट्रीय युवा प्रबोधनकार शिरपूर यांच्या वतीने कार्यक्रमात भक्त गणांसाठी मोठी धार्मिक मेजवानी मिळणार आहे.
दि. 24 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार डॉ. किमयाताई आमले यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. तसेच दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत जलाधिवास, दसविधी स्नान, पंचांग कर्म तर दुपारी 2 ते 5 या वेळेत धान्य अधिवास, न्यासविधी, शयन आधिवास, हवन, आरती, प्रसाद रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्य जी महाराज (श्री हरिहर चैतन्य धाम भांबरवाडी कन्नड) यांचा गिता रामायण सत्संग व दीपोत्सव कार्यक्रम होईल.
दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत प्रातःपूजन प्रधान होम, दुपारी 12.45 वाजता कलशरोहण सोहळा, दुपारी 3 ते 6 वाजता प्राणप्रतिष्ठा कलश रोहन, सायं पूजन, आरती तसेच रात्री 7 ते 10 वाजता परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्य जी महाराज यांचा गीता रामायण सत्संग व दिपोत्सव कार्यक्रम होईल. दि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 11 वाजता प्रातःपूजन, उत्तरांग हवन, पूर्णाहुती, आरती रात्री 8 ते 11 वाजता परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्य जी महाराज यांचा गीता रामायण सत्संग कार्यक्रम होईल.
शेवटच्या दिवशी दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात येईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
संदीप अवधूत :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा