Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

हुंडाबंदीचा प्रचारप्रसार होणे महत्त्वाचे... श्री अर्जुनभोई मुंबई




उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यावर असतांना आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे हुंडाबंदीवर पुन्हा एकदा यश आले. पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील वधूचे पिताश्री भगवान रामचंद्र भोई आणि वरखेडी येथील वराचे पिताश्री प्रकाश दशरथ वाडीले-भोई यांच्यात आज हुंडाबंदीच्या बाबतीतील निर्णय घेण्यापरी कार्य करण्यात आले आणि दोन्ही वरवधुच्या पित्यांनी आपल्या पाल्यांना सामाजिकपटलावर एक करण्याचा प्रयत्न केला. हा समाजपटलावर पुन्हा एकदा मैलाचा दगड ठरतांना दिसत आहे त्यातुनच पुन्हा जळगांव जिल्ह्यात आनंद होत आहे आणि त्या प्रसंगाचे आम्ही साक्षीदार होतांना ही आम्हाला सामाजिक समाधान लाभत आहे. या सामाजिक मनोमिलनाच्या कार्याच्या वेळी सुक्राम सुर्यवंशी विजय भोई देवराम सुर्यवंशी रेणाबाई शिवदे अल्का सुर्यवंशी शांताराम भोई सत्यम तमखाने जितुजी शिवदे आकाश नंदाने मोहन शिवदे आनंदराव शिवदे रतनलाल सुर्यवंशी मीना नंदाने लताबाई तमखाने खंडू भोई सखाराम भोई धनराज भोई तसेच यावेळी विशेष  उपस्थिती लाभली ती शिरलेली येथील समाजसेवक, हुंडाबंदीची कृती स्वत:च्या मुलाच्या लग्नात स्वत: करणारे अरुण भगवान मोरे हे ही यावेळी उपस्थित होते. त्यांनी  हुंडा प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृतीपर आपले विचार व्यक्त केले. हुंडाबंदी होणे तसेच त्याची अंमलबजावणी होणे हे सामाजिक समाज पटलावरील एक सामाजिक कार्य ठरत आहे असे आम्हास तरी वाटते.

1 टिप्पणी:

प्रसिद्ध